VIDEO:महेश भट व जिया खान यांचा लीक व्हिडिओ खरा आहे का?, 'गंदी बात' फेम अन्वेशीला पडलाय प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 05:41 PM2020-07-22T17:41:24+5:302020-07-22T17:41:56+5:30

दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि महेश भट यांचा एक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Is the leaked video of Mahesh Bhatt and Jiah Khan true? Gandi Baat Fame actress Anveshi Jain asked question | VIDEO:महेश भट व जिया खान यांचा लीक व्हिडिओ खरा आहे का?, 'गंदी बात' फेम अन्वेशीला पडलाय प्रश्न 

VIDEO:महेश भट व जिया खान यांचा लीक व्हिडिओ खरा आहे का?, 'गंदी बात' फेम अन्वेशीला पडलाय प्रश्न 

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी प्रचंड ट्रोल होत आहेत. करण जोहर, सलमान खान, आलिया भट आणि महेश भट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून महेश भट आणिरिया चक्रवर्ती यांच्या फोटोंमुळे नेटीझन्समध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. फक्त रिया चक्रवर्तीच नाहीतर इतरही अभिनेत्रींबरोबर महेश भट यांची मैत्री असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात आता दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि महेश भट यांचा एक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यात गंदी बात फेम अभिनेत्री अन्वेशी जैन हिने महेश भट यांचा जिया खान सोबतचा एक खासगी व्हिडिओ पोस्ट करुन हे खरं आहे का? असा प्रश्न आपल्या चाहत्यांना विचारला आहे.


अन्वेशीने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये महेश भट आणि जिया खान एकत्र बसून काहीतरी बोलताना दिसत आहे. खरेतर हा एक खासगी व्हिडिओ आहे. मात्र काही दिवसांपूर्वी हा जूना व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता. हा व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे का? असा प्रश्न अन्वेशीने विचारला आहे.


अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर खूप टीका झाली. यामध्ये सर्वाधिक टीका महेश भट आणि रिया चक्रवर्ती यांच्यावर झाली.

या दोघांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले असा आरोप काही जणांनी केला आहे. तसेच दोघांचे काही आक्षेपार्ह फोटो देखील सोशल मीडियावर लीक झाले होते. या पार्श्वभूमीवर महेश भट यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतो आहे.

Web Title: Is the leaked video of Mahesh Bhatt and Jiah Khan true? Gandi Baat Fame actress Anveshi Jain asked question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.