'सरकार 3' चा पोस्टर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 11:20 IST2017-02-28T05:50:51+5:302017-02-28T11:20:51+5:30

राम गोपाल वर्माच्या बहुप्रतीक्षीत चित्रपट सरकार 3 चे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. पोस्टर खूपच जबरदस्त आणि इंटरेस्टिंग आहे. ...

Launch of 'Government 3' poster | 'सरकार 3' चा पोस्टर लाँच

'सरकार 3' चा पोस्टर लाँच

म गोपाल वर्माच्या बहुप्रतीक्षीत चित्रपट सरकार 3 चे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. पोस्टर खूपच जबरदस्त आणि इंटरेस्टिंग आहे. या पोस्टरवर अमिताभ बच्चन, यामी गौतम. जॅकी श्रॉफ, मनोज बाजपेयी आणि अमित साध यांचे चेहरे अतिशय रागात दिसत आहेत. 

अमिताभ बच्चन तब्बल तिसऱ्यांदा सरकार बनून पडद्यावर परतायेत. मात्र यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा राग वाढलेला आहे. नुकतेच ट्विटरवर चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले यात चित्रपटातील संपूर्ण टीम दिसतेय.  



अमिताभ बच्चन या चित्रपटात सुभाष नागरे अर्थाच सरकार या  मुख्य भूमिकेत दिसतील तर काबीलमध्ये नेत्रहिन व्यक्तीची भूमिका साकारणारी यामी गौतम अनु करकरेची भूमिकेत दिसेल . नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी यामी या चित्रपटात एका वेगळ्या अंदाजात दिसतेय. रनिंग शादी या चित्रपटात सरळ साधा प्रेमी दिसणारा अमित साध  शिवाजी नागरेच्या भूमिकेत डेंजरस दिसणार आहे. मनोज बायपेयी एका चाणक्य राजकारण्याची भूमिका साकारणार आहे. जॅकी श्रॉफ एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. गोरख रामपुरची भूमिका भारत दाभोलकर साकरतोय तर रोहणी हट्टंगडी ही रुक्कू बाई देवींच्या भूमिकेत असतील याशिवाय रॉनित रॉय ही या चित्रपटात आहे. 

राम गोपाल वर्मा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. हा चित्रपट सरकार सरकार सीरीजमधला तिसरा चित्रपट आहे. पहिला चित्रपट 2005मध्ये आला होता. तर 2008 मध्ये सरकार राज हा दुसरा चित्रपट आहे. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांन खूप आवडले होते.  7 एप्रिल हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी 17 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र त्यानंतर काही करणामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारखी पुढे ढकलण्यात आली.  

Web Title: Launch of 'Government 3' poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.