अनारकली आॅफ आराचा टीजर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 18:23 IST2017-02-11T12:53:59+5:302017-02-11T18:23:59+5:30

स्वरा भास्करच्या आगामी ‘अनारकली आॅफ आरा’ंचा टीजर अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच सोशल मिडीयावर लाँच केला.

Launch of Anarkali of Harry Teaser | अनारकली आॅफ आराचा टीजर लाँच

अनारकली आॅफ आराचा टीजर लाँच

वरा भास्करच्या आगामी ‘अनारकली आॅफ आरा’ंचा टीजर अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच सोशल मिडीयावर लाँच केला. बिहारमधील आरा येथे राहणाºया आणि अश्लील गाणी गाणाºया गायिकेची ही कथा आहे. दुहेरी अर्थाची गाणी गाण्यासाठी ही गायिका प्रसिद्ध होती. येत्या २४ मार्च रोजी हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे. अविनाश दास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
 


पीटीआयशी बोलताना सोनम कपूर म्हणाली, स्वरा ही माझी मैत्रीण आहे. अभिनेत्री म्हणून मला तिचा नेहमीच आदर वाटतो. मी ज्यावेळी अनारकली आॅफ आराचा टीजर पाहिला, त्यावेळी मी खूप एक्साईट झाले. या चित्रपटासाठी माझा तिला नेहमीच पाठिंबा राहणार आहे. 
स्वरानेही सोनमचे आभार मानले आहेत. सोनम ही बॉलीवूडमधील सर्वात सुंदर व्यक्ती आहे, असं मी म्हणते. मला नेहमीच तिचे पाठबळ असते. महिलांमधील सर्वात सुंदर मैत्रीण म्हणून मला ती आवडते असेही स्वराने म्हटले आहे. यापूर्वी या दोघींनी एकत्र काम केले आहे. रांझणा आणि प्रेम रतन धन पायोमध्ये या दोघी दिसून आल्या होत्या. 
संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी, इश्कियाक खान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 
 

Web Title: Launch of Anarkali of Harry Teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.