​या ‘कॅट फाईट’वर हसावं की रडावं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 15:58 IST2016-06-08T10:28:01+5:302016-06-08T15:58:01+5:30

बॉलीवुडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कॅटफाईट काही नवं नाही. मात्र एका ज्युनियर अभिनेत्रीला स्टार अभिनेत्रीमुळं असुरक्षित वाटू लागणं म्हणजे नक्कीच ...

Laugh or cry on this 'Fight Fight'? | ​या ‘कॅट फाईट’वर हसावं की रडावं ?

​या ‘कॅट फाईट’वर हसावं की रडावं ?

लीवुडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कॅटफाईट काही नवं नाही. मात्र एका ज्युनियर अभिनेत्रीला स्टार अभिनेत्रीमुळं असुरक्षित वाटू लागणं म्हणजे नक्कीच काही तरी गडबड आहे. या दोन अभिनेत्रींमध्ये कॅटफाईट रंगलीय हे ऐकूनही नवल वाटेल. मात्र सध्या बी-टाऊनमध्ये याच ज्युनियर-सिनीयर अभिनेत्रीच्या कॅट फाईटची चर्चा सुरु आहे. हिरोपंती सिनेमातून एंट्री मारलेली कृती सॅनॉन आगामी राबता सिनेमात सुशांतसिंह राजपूतसह काम करतेय. सध्या या सिनेमाचं शुटिंग सुरु आहे. मात्र या सिनेमात दिग्दर्शक दिनेश विजयन यांनी एक आयटम साँग घ्यायचं ठरवलं. त्याच आयटम साँगसाठी दिनेश यांनी अभिनेत्री दीपिकाला साईन केलं. बॉलीवुडच्या मस्तानीच्या एंट्रीमुळंच कृतीला असुरक्षित वाटू लागलंय. सिनेमात मुख्य भूमिका असूनही दीपिकाच भाव खाऊन जाईल अशी भीती तिला वाटतेय. त्यामुळंच दीपिकाबाबत आधीच का सांगितलं नाही यावरुन कृतीनं नाराज व्यक्त केल्याचंही समजतंय. याची चर्चा सुरु होताच कृतीनं सारवासारव केली असून कॅटफाईटच्या निव्वळ अफवा असल्याचं कृतीनं म्हटलंय.

Web Title: Laugh or cry on this 'Fight Fight'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.