Latest Photoshoot​ : फेरेल विलियमसोबत दिसली ऐश्वर्या राय बच्चन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 12:02 IST2018-04-03T06:32:53+5:302018-04-03T12:02:53+5:30

ऐश्वर्या राय बच्चन एका सहा वर्षांच्या मुलीची आई आहे. पण म्हणून ऐश्वर्याचे ग्लॅमर जराही कमी झालेले नाही. बॉलिवूड आणि ...

Latest Photoshoot: Aishwarya Rai Bachchan appeared with Ferrell William! | Latest Photoshoot​ : फेरेल विलियमसोबत दिसली ऐश्वर्या राय बच्चन!

Latest Photoshoot​ : फेरेल विलियमसोबत दिसली ऐश्वर्या राय बच्चन!

्वर्या राय बच्चन एका सहा वर्षांच्या मुलीची आई आहे. पण म्हणून ऐश्वर्याचे ग्लॅमर जराही कमी झालेले नाही. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील तिची लोकप्रीयताही जराही कमी झालेली नाही.  तशीही ऐश तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवरील तिचा वावर म्हणूनचं जगभरातील चाहत्यांच्या डोळ्यांत भरतो. ऐश्वर्याचा असाच काहीसा अंदाज पुन्हा एकदा बघायला मिळाला. होय, ‘वोग’ या लोकप्रीय मॅगझिनसाठी ऐश्वर्याने अलीकडे फोटोशूट केले. पण एकटीने नाही तर अमेरिकन रॅपर फेरेल विलियम्स सोबत.



‘वोग’च्या कव्हरपेजवर ऐश्वर्या व फेरेल झळकलेत.  या दोघांचा कूल अंदाज लोकांना चांगलाच भावला. त्यामुळेच सोशल मीडियावर हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. कव्हरपेजवरील फोटोत ऐश्वर्या निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये आहे.



फेरेल विलियम्स एक लोकप्रीय गायक आहे. ११ वेळा ग्रॅमी अवार्ड जिंकणा-या फेरेलची खूप मोठी फॅन फॉलोर्इंग आहे. ऐश्वर्याबद्दल सांगायचे तर ती सध्या ‘फन्ने खां’च्या शूटींगमध्ये बिझी आहे.



‘फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत. ‘फन्ने खां’आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे.



ALSO READ : ऐश्वर्या राय बच्चनचे वाढले नखरे! केले असे काही की,पती अभिषेक बच्चनही झाला नाराज!!

अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील तीन गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच  एका डान्स साँगसोबत ऐश्वर्याची एन्ट्री होणार आहे.   याशिवाय १९६४ मध्ये आलेल्या ‘वो कौन थी’ या आयकॉनिक चित्रपटातही ऐश्वर्या दिसणार अशी चर्चा आहे. या चित्रपटाची आॅफर आपल्याला मिळाली असून चर्चा सुरू आहे, असे ऐश्वर्याने स्पष्ट केले आहे. या चित्रपटात ऐश्वर्याच्या अपोझिट शाहिद कपूर दिसणार असल्याचीही चर्चा आहे.

Web Title: Latest Photoshoot: Aishwarya Rai Bachchan appeared with Ferrell William!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.