लता मंगेशकर करणार रणवीर सिंगचा सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 04:06 IST2016-02-27T10:54:03+5:302016-02-27T04:06:31+5:30
बाजीराव मस्तानी फेम रणवीर सिंगला एप्रिल महिन्यात दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ...
.jpg)
लता मंगेशकर करणार रणवीर सिंगचा सत्कार
ब जीराव मस्तानी फेम रणवीर सिंगला एप्रिल महिन्यात दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दिली. लता मंगेशकर यांच्या मार्गदर्शनात मंगेशकर कुटुंबीय त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करतात. या वेळी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.
यावर्षी हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी पुण्यात होत असून, अभिनेता रणवीर सिंगला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रणवीर हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा एक चांगला अभिनेता आहे. आमच्या वडिलांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार यावर्षी रणवीरला देताना आम्हाला आनंद होत आहे, अशी भावना लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. रणवीरने २०१० ला ह्यबँड बाजा बारातह्ण या चित्रपटाने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. या नंतर त्याने गलीयोकी रासलीला रामलीला तसेच लुटेरा यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.