लक्ष्मी राय म्हणतेय, धोनीसोबतचे नाते डागासारखे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:50 IST2017-01-05T18:24:31+5:302017-01-06T16:50:12+5:30
धोनीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून भारतीय संघाच्या नेतृत्त्वाचा राजीनामा दिल्याने त्याच्याविषयी पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धोनीच्या कारकिर्दीत फार ...

लक्ष्मी राय म्हणतेय, धोनीसोबतचे नाते डागासारखे
ध नीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून भारतीय संघाच्या नेतृत्त्वाचा राजीनामा दिल्याने त्याच्याविषयी पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धोनीच्या कारकिर्दीत फार मोजके वाद झालेले आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लक्षात राहिलेला वाद म्हणजे चेन्नईतील अभिनेत्री लक्ष्मी राय हिच्याबरोबरच्या अफेयरचा वाद. काही वर्षांपूर्वी धोनी आणि लक्ष्मी यांच्या अफेयरच्या अनेक बातम्या आल्या होत्या. आयपीएल दरम्यान लक्ष्मी आणि धोनीच्या डेटींगच्या बातम्याही आल्या होत्या. धोनीने मात्र या बातम्या फेटाळल्या होत्या. त्यानंतर दोघांचे नाते संपले. पण लक्ष्मीला प्रत्येक ठिकाणी याबाबतच विचारणा होऊ लागल्याने, मुलाखतीत तिने याबाबत टोकाचे मत व्यक्त केले होते.आम्ही सर्व विसरलो लोक मात्र तिथेच अटकलेले असे सांगत लक्ष्मी म्हणाली मी आणि धोनी यातून बाहेर निघालो आहोत. लोक मात्र अजूनही त्याठिकाणी अडकलेले आहेत. या सर्वाला आता ८ वर्षे लोटली आहेत. लक्ष्मी म्हणाली मी तेव्हा टीमची ब्रँड अॅम्बेसेडर होती. तो टीममध्ये असल्याने आम्ही एका वषार्पेक्षाही कमी काळ सोबत होतो. आम्ही कधीही एकमेकांना कमिटमेंट केले नाही आणि लग्नाचा विषयही काढला नाही. आमचे नाते एखाद्या डागाप्रमाणे असल्याचे सांगत, लक्ष्मी म्हणतेय, काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राशी चर्चा करताना लक्ष्मी राय म्हणाली होती की, एवढ्या दिवसांनंतरही धोनीचे नाव निघाले की माझे नाव घेतले जाते. आजही आमच्या रोमान्सच्या अफवा उडतात. मला या सवार्चा राग येतो. आमचे नाते एखाद्या डागाप्रमाणे वाटत आहे, असेही ती म्हणाली होती. धोनीनंतरही माझे तीन चार जणांशी नाते होते, पण त्याबाबत कोणी विचारत नाही, असेही ती म्हणाली.