​Lag Ja Gale Song OUT : तुम्हाला नक्की आवडेल, ‘भूमी’चे पहिले रोमॅन्टिक गाणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 14:17 IST2017-08-23T08:47:14+5:302017-08-23T14:17:14+5:30

‘भूमी’ या संजय दत्तच्या आगामी चित्रपटाचे नवे गाणे आज रिलीज झाले. ‘लग जा गले...’ असे बोल असलेले हे गाणे अदिती राव हैदरी आणि सिद्धांत गुप्ता यांच्यावर चित्रीत आहे.

Lag Ja Gale Song OUT: You would love, the first romantic song of 'Land'! | ​Lag Ja Gale Song OUT : तुम्हाला नक्की आवडेल, ‘भूमी’चे पहिले रोमॅन्टिक गाणे!

​Lag Ja Gale Song OUT : तुम्हाला नक्की आवडेल, ‘भूमी’चे पहिले रोमॅन्टिक गाणे!

ूमी’ या संजय दत्तच्या आगामी चित्रपटाचे नवे गाणे आज रिलीज झाले. ‘लग जा गले...’ असे बोल असलेले हे गाणे अदिती राव हैदरी आणि सिद्धांत गुप्ता यांच्यावर चित्रीत आहे. यात दोघेही अतिशय क्यूट व रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. 
संजय दत्तच्या ‘भूमी’चे हे पहिले रोमॅन्टिक गाणे आहे. सचिन जिगरने कम्पोज केलेल्या या गाण्याला स्वरबद्ध केलेयं, राहत फतेह अली खान यांनी. हे गाणे लता मंगेशकर यांच्या ‘लग जा गले’ या एव्हरग्रीन गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे, अशी चर्चा होती. पण असे मुळीच नाही. 
रोमॅन्टिक मनाच्या बॉलिवूडप्रेमींना हे गाणे नक्की आवडेल असेच आहे. यातील पिक्चराईझेशन अतिशय सुंदर आणि अनोखे आहे. आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालच्या अवतीभवती हे गाणे शूट करण्यात आले आहे.



अदिती राव हैदरीने स्वत:च्या TWITTER हँडलवर हे गाणे शेअर केले आहे. राहत फतेह अली यांच्या आवाजातील या गाण्यात तुम्ही स्वत:ला विसरून जाल, असे तिने हे गाणे शेअर करताना लिहिलेय. या गाण्यापूर्वी ‘भूमी’तील ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ हे आयटम नंबर रिलीज झाले होते. सनी लिओनीचे हे आयटम नंबर सध्या सगळ्यांच्याच ओठांवर आहे.

ALSO READ : Bhoomi song OUT : ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ गाणे रिलीज; पाहा, सनी लिओनीचा ‘शकीरा स्टाईल’ डान्स !

‘भूमी’ या चित्रपटात एका बाप-लेकीची कथा दिसणार आहे. संजय दत्त यात मुख्य भूमिकेत आहे. संजय आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करत असतो. पण त्याची जीवापाड जपलेली मुलगी काही नराधमांच्या अत्याचाराला बळी पडते. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी हा पिता संपूर्ण जगाशी लढायला निघतो आणि आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा सूड घेतो. संजयसोबत शेखर सुमन आणि शरद केळकर यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  उमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबरला रिलीज होतो आहे.  

Web Title: Lag Ja Gale Song OUT: You would love, the first romantic song of 'Land'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.