क्रिती सेनॉन आणि दलजित दोसांझचा 'अर्जून पटियाला' ह्या दिवशी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 08:25 PM2019-03-27T20:25:00+5:302019-03-27T20:25:00+5:30

क्रिती अर्जुन पटियाला चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दलजित दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Kriti Seanon and Daljit Dosanjh will be present on the day of 'Arjun Patiala' | क्रिती सेनॉन आणि दलजित दोसांझचा 'अर्जून पटियाला' ह्या दिवशी होणार प्रदर्शित

क्रिती सेनॉन आणि दलजित दोसांझचा 'अर्जून पटियाला' ह्या दिवशी होणार प्रदर्शित

googlenewsNext
ठळक मुद्दे येत्या २९ जुलैला 'अर्जुन पटियाला' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटानंतर ती अनेक बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली. नुकताच तिचा 'लुका छुपी' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता क्रिती 'अर्जुन पटियाला' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दलजित दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 'अर्जुन पटियाला' या चित्रपटाची नवी तारीख ट्विटरवर जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट केले की, 'अर्जुन पटियाला चित्रपटाची नवी तारीख. चित्रपट १९ जुलै, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दलजित दोसांझ, क्रिती सेनॉन व वरूण शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित जुगराजने केले आहे. तर निर्मिती भूषण कुमार, क्रिष्णन कुमार, दिनेश विजान व संदीप ल्येझेन यांनी केली आहे.'




अर्जुन पटियाला हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाबद्दल क्रितीने सांगितले की, 'कॉमेडी चित्रपटात काम करणे काही कठीण व चॅलेजिंग असते.' क्रिती व दलजित दोसांझ यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना भावेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Kriti Seanon and Daljit Dosanjh will be present on the day of 'Arjun Patiala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.