क्रिती सनॉन, करीना कपूर आणि तब्बू झळकणार 'द क्रू'मध्ये, या दिवशी चित्रपट येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 05:57 PM2024-02-02T17:57:01+5:302024-02-02T17:58:24+5:30

The Crew Movie : करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सनॉन यांच्या 'द क्रू' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Kriti Sanon, Kareena Kapoor and Tabu will star in 'The Crew', the film will be released on this day | क्रिती सनॉन, करीना कपूर आणि तब्बू झळकणार 'द क्रू'मध्ये, या दिवशी चित्रपट येणार भेटीला

क्रिती सनॉन, करीना कपूर आणि तब्बू झळकणार 'द क्रू'मध्ये, या दिवशी चित्रपट येणार भेटीला

करीना कपूर (Kareena Kapoor ), तब्बू (Tabu) आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) यांच्या 'द क्रू' (The Crew Movie) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. पहिल्यांदाच इंडस्ट्रीतील तीन आघाडीच्या अभिनेत्री एकत्र आपली जादू दाखवताना दिसणार आहेत. करीना कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे. हा चित्रपट २९ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे. एकता कपूर आणि रिया कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

द क्रू हा एकता कपूर आणि रिया कपूरचा खास प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई आणि अबुधाबीमध्ये झाले आहे. हा चित्रपट आधी २२ मार्चला रिलीज होणार होता पण आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट २९ मार्चला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टीझर शेअर करून निर्मात्यांनी नवीन रिलीज डेटची माहिती दिली आहे.

बेबोने शेअर केला टीझर 
करीना कपूरने 'द क्रू'चा एक मजेशीर टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये करीना, क्रिती आणि तब्बू एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये एअरपोर्टवर फिरताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये चोली के पीछे क्या है हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. व्हिडिओमध्ये विमानाचा कॅप्टन म्हणतो, मॅम आणि सर, मी तुमचा कॅप्टन बोलतोय. आजच्या फ्लाइटमध्ये आपले स्वागत आहे. आमचे कर्मचारी तुमची पूर्ण काळजी घेतील. पण तुम्हा सर्वांना विनंती आहे की, हृदय बाहेर पडू नये म्हणून सीट घट्ट बांधा. व्हिडिओ शेअर करताना करीनाने लिहिले - सीट बांधा, तुमचे पॉपकॉर्न तयार करा आणि सर्व्ह करण्यासाठी तयार व्हा. द क्रू या मार्चमध्ये रिलीज होत आहे.
 

Web Title: Kriti Sanon, Kareena Kapoor and Tabu will star in 'The Crew', the film will be released on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.