कृष्णा अभिषेक म्हणतो, मी कपिल शर्माला चार महिने ब्रेक घेण्याचा सल्ला देईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 10:09 IST2017-05-03T10:53:20+5:302017-05-07T10:09:19+5:30
-रूपाली मुधोळकर टीव्ही जगतातील आघाडीचा विनोदी कलाकार अर्थात कॉमेडीयन कृष्णा अभिषेक लवकरच आपल्याला एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. ...

कृष्णा अभिषेक म्हणतो, मी कपिल शर्माला चार महिने ब्रेक घेण्याचा सल्ला देईल!
टीव्ही जगतातील आघाडीचा विनोदी कलाकार अर्थात कॉमेडीयन कृष्णा अभिषेक लवकरच आपल्याला एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. अतिशय रोमांचक असा एक नवा-कोरा ‘इंडिया बनेगा मंच’ हा रिअॅलिटी शो कृष्णा घेऊन येतो आहे. रस्त्यांवरच्या टॅलेंटला नवी ओळख मिळवून देणारा हा शो येत्या ७ मेपासून कलर्स वाहिनीवर सुरु होणार आहे. या शोच्या निमित्ताने कृष्णा अभिषेकने नागपुरच्या लोकमत कार्यालयास भेट दिली. यावेळी कृष्णासोबत दिलखुलास गप्पा रंगल्या. याच गप्पांचा सारांश खास आपल्यासाठी...
प्रश्न : ‘इंडिया बनेगा मंच’ हा एक मोठा रिअॅलिटी शो तू होस्ट करतोय, याबद्दल काय सांगशील?
कृष्णा : ‘इंडिया बनेगा मंच’ हा एक आगळा-वेगळा रिअॅलिटी शो आहे. असा शो भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच पे्रक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा एक स्ट्रिट रिअॅलिटी शो आहे. म्हणजेच रस्त्यांवरच्या प्रतिभावंतांना एक मोठे व्यासपीठ देण्याचे काम आम्ही याद्वारे करणार आहोत.
प्रश्न : स्ट्रिट रिअॅलिटी शो म्हणजे, या शोची नेमकी थीम काय?
कृष्णा : वेगवेगळ्या शहरात अगदी रस्त्यांवर याचे आॅडिशन होणार आहे. टॅलेंट सादर करणारा स्पर्धक याठिकाणी आपल्या कलेचे प्रदर्शन करेल. आपल्या टॅलेंटच्या जोरावर तो जितकी गर्दी जमवेल, तितके वोट त्याला मिळतील. पब्लिक हीच या शोची जज असेल. एका गुप्त कॅमेºयाने या सगळ्या शोचे शूटींग होईल. जनतेच्या वोटींगमधून निवडलेले जाणारे स्पर्धक फायनलमध्ये जातील. आत्तपर्यंत तीन जज समोर बसून कुण्या एकाला विनर ठरवत आले आहेत. पण आमच्या शोमध्ये अख्खा भारत जजच्या भूमिकेत आहे.
प्रश्न : कपिल शर्माच्या शोचा टीआरपी कमी झालाय. कपिलला टीआरपी वाढवायचा झाल्यास तू त्याला काय सल्ला देशील?
कृष्णा: (खळखळून हसत) मी त्याला चार महिने ब्रेक घेण्याचा सल्ला देईल. कारण माझा रिअॅलिटी शो येतोय.
प्रश्न : कपिल शर्मासोबत कृष्णाचे पॅचअपसाठी तयार, अशी एक ब्रेकिंग न्यूज आम्ही मध्यंतरी ऐकली. यात किती सत्य आहे?
कृष्णा: हो. मी कपिलसोबत काम करायला तयार आहे, असे मी म्हटले होते. कारण आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. आम्ही पुन्हा एकत्र आलो असतो तर आमचा शो सुपरडुपर हिट होण्यापासून कुणीही रोखू शकले नसते, असे मला वाटले होते.
प्रश्न : पुढाकार घेऊनही कपिलच्या शोमध्ये तू का दिसला नाहीस?
कृष्णा : सुरुवातीपासून काही प्रॉब्लेम होतेच. अगदी प्रारंभी कपिलने मला त्याच्या या शोची आॅफर दिली होती. पण मी त्याची ही आॅफर नाकारली होती. कपिलच्या शोमध्ये मधे-मध्ये येणाºया कलाकारांसारखा मी नाहीच. त्यामुळे त्याची आॅफर स्वीकारण्यात काहीही राम नव्हता. कदाचित सुरुवातीपासूनचे हे प्रॉब्लेम अजूनही पूर्णपणे दूर झालेले नाहीत.
कॉन्टोवर्सी कलाकाराला मोठे होण्यास किती मदत करते?
कृष्णा : खूप मोठी मदत करते. पण ही कॉन्ट्रोव्हर्सी कुठल्या स्तराची आहे, यावर बरेच काही अवलंबून असते. काही लोक केवळ फुटकटची प्रसिद्धी लाटण्यासाठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण करतात. पण जोक्स अपार्ट, शेवटी तुमचे काम हेच तुम्हाला मोठे करते. काम नसेल तर कितीही कॉन्ट्रोव्हर्सी करा, त्याचा जराही फायदा होणार नाही.
प्रश्न : जॉन अब्राहम आणि तनिष्ठा चॅटर्जी या दोघांसोबतच्या तुझ्या कॉन्ट्रोव्हर्सी बरीच चर्चा झाली. ते सगळे कशासाठी होते?
कृष्णा : त्यामागे खरचं काहीही उद्देश नव्हता. ‘कॉमेडी नाई्टस बचाओ’च्या सेटवर जॉन पहिल्यांदा आला तेव्हा त्याला काहीही तक्रार नव्हती. पण दुसºयांदा तो आला तेव्हा तुला माझी जितकी टर उडायची तितकी उडव, असे तो मला आधीच म्हणाला होता. मी त्याच्या म्हणण्यानुसारच केले. पण का कुणास ठाऊक तो रागावला. तनिष्ठा चॅटर्जीला तर मी आधी ओळखतही नव्हतो. तो पुर्णपणे पब्लिसिटी स्टंट होता.
प्रश्न : येणा-या काळात तू स्वत:ला कुठे पाहतोस?
कृष्णा : (त्याच्या चिरपरिचित विनोदी शैलीत) येत्या वर्षांत मी सुपरस्टार झालेलो मला बघायचे आहे.
प्रश्न : येत्या काळात कुठल्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये तुला तुझ्या चाहत्यांना बघता येईल?
कृष्णा : अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर सध्या माझ्याकडे कुठलाही फिल्म प्रोजेक्ट नाही. लहान मोठ््या आॅफर्स आल्यात, येत आहेत. पण छोटा-मोठा हिरो बनण्यात मला रस नाही. काही मोठे असेल तर मी नक्की करेल.
प्रश्न : तू अभिनेता नसताच तर काय बनला असता?
cnxoldfiles/strong> मी अभिनेता नसतो तर एक शेफ बनलो असतो. मला कुकींगची प्रचंड आवड आहे. (माझी बायको खूप लकी आहे.) कुठलाही नवा पदार्थ चाखला की, मी अगदी तशाच चवीचा पदार्थ बनवू शकतो. नागपुरातले सावजी चिकनही मी टेस्ट करणार आहे आणि घरी गेल्या गेल्या ट्राय करणार आहे.