Koffee With Karan: ​संजय दत्तसाठी करण जोहरने केली होती चिटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 20:45 IST2017-01-20T15:15:04+5:302017-01-20T20:45:04+5:30

बॉलीवूडमध्ये अत्यंत वादग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कॉफी विथ करण’ या सेलिब्रेटी चॅट शोच्या यशाचे एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे सहभागी ...

Koffee With Karan: Sanjay Dutt had Karan Johar chitping! | Koffee With Karan: ​संजय दत्तसाठी करण जोहरने केली होती चिटिंग!

Koffee With Karan: ​संजय दत्तसाठी करण जोहरने केली होती चिटिंग!

लीवूडमध्ये अत्यंत वादग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कॉफी विथ करण’ या सेलिब्रेटी चॅट शोच्या यशाचे एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे सहभागी झालेल्या स्टार्सची धांदल उडविणारा ‘रॅपिड फायर’ राउंड. या भागात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना डोक्यात जे पहिले येईल ते उत्तर देणे अपेक्षित असते. आकर्षक गिफ्ट हॅम्परच्या हव्यासापोटी कित्येक कलाकारांनी रॅपिड फायरमुळे वाद निर्माण केले आहेत.

परंतु करण जोहरने एका एपिसोडमध्ये चिटिंग करून एका स्टारला जिंकून दिले होते. हे गुपित बाहेर पाडले आहे ते खुद्द करणनेच. त्याच्या ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्रात त्याने लिहिले की, ‘माझ्या ‘कॉफी विथ करण’च्या संपूर्ण इतिहासात मी केवळ एकदाच सहभागी कलाकाराला रॅपिड फायर राउंडमधील प्रश्न शोच्या आधीच दाखवले होते. तो स्टार म्हणजे संजय दत्त.’

बरं करणने असे का केले? तो म्हणतो, ‘या शोच्या पहिल्या सीझनमध्ये एका एपिसोडसाठी संजू आणि सुश्मिता सेन येणार होते. मला माहित होते की, सुश्मिता या राउंडमध्ये झटपट उत्तरे देईल पण संजयबाबत मी जरा साशंक होतो. तो केवळ ढिम्मसारखा बसू नये म्हणून मी त्याला आधीच सर्व प्रश्न दाखवले होते, जेणेकरून त्याला तयारीला पुरेसा वेळ मिळेल आणि तो उत्तरे विचार करून ठेवेल.’

ALSO READ: ​करण म्हणतो, माझ्या व काजोलच्या नात्यात आता काहीही उरलेले नाही

करणच्या अशा चिटिंगमुळे काही फायदा झाला? फायदा कसा नाही झाला! संजयने सुश्मिताला हरवून गिफ्ट हॅम्पर जिंकले होते. आता बिचाऱ्या सुश्मिताला जेव्हा हे माहित पडेल तेव्हा तिला काय वाटेल? प्रत्येक एपिसोडमध्ये आपण पाहतो की, सर्व स्टार्स रॅपिड फायर जिंकण्यासाठी किती चुरस दाखवतात. स्वत: आमिरसुद्धा दोन्ही वेळेस त्यासाठी उत्सुक दिसला.

करण जोहरची आॅटोबायोग्राफी अनेक कारणांसाठी सध्या गजत आहे. त्याच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यातील अनेक किस्से, गुपिते त्याने या पुस्तकात उघड केली आहेत. शाहरुख खानसोबतच्या मैत्रीतील चढ-उतार, काजोलशी झालेला वाद, आर्थिक कारणांवरून एककेकाळी करिनाशी आलेला दुरावा, समकालिन दिग्दर्शकांबद्दल वाटणारा हेवा, त्याची लैंगिकता अशा अनेक विषयांवर त्याने मोकळेपणाने या पुस्तकात लिहिले आहे.

ALSO READ: सेक्ससाठी करण जोहरने दिले होते पैसे!​

Web Title: Koffee With Karan: Sanjay Dutt had Karan Johar chitping!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.