कोएनाच्या नावाने अपलोड केले गेलेत पॉर्न व्हिडीओ, संतापली ‘साकी साकी गर्ल’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 02:57 PM2020-07-17T14:57:24+5:302020-07-17T14:57:50+5:30

कोएनाच्या नावाने फेक अकाऊंट बनवण्यात आले आणि या अकाऊंटवर तिच्या नावाने अनेक पॉर्न व्हिडीओ पोस्ट केले गेलेत. ही बाब लक्षात येताच कोएना संतापली

koena mitra furious at fake fan account sharing shady content on youtube and instagram in her name | कोएनाच्या नावाने अपलोड केले गेलेत पॉर्न व्हिडीओ, संतापली ‘साकी साकी गर्ल’

कोएनाच्या नावाने अपलोड केले गेलेत पॉर्न व्हिडीओ, संतापली ‘साकी साकी गर्ल’

googlenewsNext
ठळक मुद्दे‘साकी साकी गर्ल’ नावाने प्रसिद्ध असणारी कोएना मित्रा दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे.

सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींचे फॅन पेजेस आहेत. या फॅन पेजेसवर सेलिब्रिटीचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले जातात. मात्र आता या फॅन पेजच्या दुरूपयोगाचे एक प्रकरण समोर आले आहे. होय, अभिनेत्री कोएना मित्रा हिला यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. तिच्या नावाचा दुरूपयोग केला गेला. कोएनाने या फॅन पेजचे स्क्रिनशॉट्स शेअर करत यावर संताप व्यक्त केला.
कोएनाच्या नावाने युट्यूबवर एक फेक अकाऊंट बनवण्यात आले आणि या अकाऊंटवर तिच्या नावाने अनेक पॉर्न व्हिडीओ पोस्ट केले गेलेत. ही बाब लक्षात येताच कोएना संतापली आणि तिने या युट्यूब पेजला कडक शब्दात फटकारले आहे.

एका पाठोपाठ एक ट्वीट करत तिने आपला संताप व्यक्त केला.  पहिल्या ट्वीटमध्ये तिने दोन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. एक स्क्रीनशॉट यूट्यूब अकाउंटचा आहे, तर दुसरा इन्स्टाग्राम अकाउंटचा आहे. यातील युट्यूब अकाउंटमध्ये कोएना मित्राचे नाव आणि तिचाच डिस्प्ले फोटो आहे.
 
या अकाउंट पॉर्न व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. ‘तुम्हाला असं वाटतं का ही हा फॅन क्लब आहे? फॅन्स असे शेडी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतात का? या अकाउंटच्या माध्यमातून मला बदनाम करण्यात येत आहे. याचे मेल/अकाउंट डीटेल/बायो सर्व चेक करा, हा गुन्हा नाही आहे तर काय?असा सवाल तिने केला.

यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये कोएनाने एका ट्विटर युजरला उत्तर दिले आहे. या युजरने पहिल्या पोस्टमधील इन्स्टाग्रामच्या स्क्रीनशॉटबाबत सवाल उपस्थित केला होता.काय हे दोन्ही अकाउंट एकच व्यक्ती चालवत आहे का? मला डाव्या बाजुला असणा-या इन्स्टाग्राममध्ये कोणतीही अश्लीलता आढळून येत नाही आहे पण उजव्या बाजुचे (युट्यूब) अत्यंत वाईट आहे, असे त्याने म्हटले. त्याला उत्तर देताना कोएनाने लिहिले, ‘ दोन्ही अकाउंट चुकीची आहेत. एकतर हे फॅन क्लब नाहीत किंवा फॅन पेजही नाहीत.  साहिल आणि सना खान कोण आहेत? हे लोकं युट्यूब चॅनेल चालवतात आणि पॉर्न व्हिडीओ पोस्ट करत आहेत. कमेंट करण्यााआधी त्यांचा बायो वाचा’.
‘साकी साकी गर्ल’ नावाने प्रसिद्ध असणारी कोएना मित्रा दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. तिने रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस मध्ये एंट्री घेऊन पुन्हा प्रसिद्धी मिळवली होती. मात्र यानेही तिच्या करिअरसाठी असा विशेष फायदा झाला नाही. मात्र तिचे सोशल मीडियावर फॉलोअर्स जरूर वाढले आहेत.
 

Web Title: koena mitra furious at fake fan account sharing shady content on youtube and instagram in her name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.