जाणून घ्या मराठी चित्रपटात काम करण्याबद्दल काय मत आहे काजोलचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 11:36 IST2018-05-31T06:06:20+5:302018-05-31T11:36:20+5:30
माधुरी दीक्षितने बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे नुकतेच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

जाणून घ्या मराठी चित्रपटात काम करण्याबद्दल काय मत आहे काजोलचे
म धुरी दीक्षितने बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे नुकतेच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता माधुरी नंतर अभिनेत्री काजोलनेही मराठी चित्रपटामध्ये काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. चांगली फिल्म मिळाली तर मराठीत नक्की काम करेन असे तिने सिंगापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात लोकमतशी बोलताना सांगितले.
सिंगापूर येथील मादाम तुसा वॅक्स म्युझियममध्ये अभिनेत्री काजोलची प्रतिमाही आता ठेवण्यात आली आहे. आपल्या स्टॅच्यूच्या उद्घाटनासाठी सिंगापूरला गेल्यावर काजोलने मीडियाशी खूप साऱ्या गप्पा मारल्या. यावेळेस आपल्या घरात आधीपासूनच मराठी असल्यामुळे आपण मराठीमध्ये फिल्म करणार का असा प्रश्न लोकमततर्फे विचारताच काजोलने त्यास होकार दिला आणि चांगला सिनेमा मिळाला तर मराठीत काम करेन असे उत्तर दिले. मादाम तुसाँ गॅलरीमध्ये आपली प्रतिमा असणे हा सन्मान आहे असे तिने सांगितले. ज्यावेळेस आपली मेणाची प्रतिमा या गॅलरीमध्ये ठेवली जाणार आहे हे समजलं, तेव्हा मला अत्यंत आनंद झाला. आता ती प्रत्यक्षात पाहण्याचा क्षण तितकाच आनंदी असून मला आपण आरशातच पाहात आहे असं वाटलं.
आपल्याच स्टॅच्यूच्या उद्घाटनासाठी सिंगापूरला पोहोचलेल्या काजोलचे काही फोटोज् आणि व्हिडीओ सोशल मीडियावर देखील चांगलेच व्हायरल झाले आहेत. काजोलच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी काजोल मुलगी न्यासासोबत त्याठिकाणी उपस्थित होती. काजोलने आपल्या पुतळ्यासोबत काही फोटोही क्लिक केले. त्याचबरोबर जेव्हा ती पुतळ्याजवळ उभी राहिली, तेव्हा मुलगी न्यासाचा एकच गोंधळ उडाला होता. त्याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला होता. व्हिडीओमध्ये न्यासाने मम्मी काजोलचा स्टॅच्यू बघितल्यानंतर असे काही रिअॅक्शन दिले की, जणू काही तिचा यातील आपली मम्मी नेमकी कोणती असाच काहीसा गोंधळ झाला असावा असे दिसत होते.
दरम्यान, सध्या काजोल तिच्या आगामी ‘ईला’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रदीप सरकार करीत आहेत. हा चित्रपट १४ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Also Read : हनिमून सोडून पळून आला होता अजय देवगण, स्वत:च केला खुलासा!