केआरकेने केली आत्महत्या, वाचा या बातमीमागील सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 19:59 IST2017-11-07T14:29:26+5:302017-11-07T19:59:52+5:30

काही दिवसांपूर्वीच स्वयंघोषित फिल्म क्रिटिक कमाल राशिद खान ऊर्फ केआरके याने त्याचे बंद केलेले ट्विटर अकाउंट सुरू करा अन्यथा ...

KKK has committed suicide, read or truth in the news! | केआरकेने केली आत्महत्या, वाचा या बातमीमागील सत्य !

केआरकेने केली आत्महत्या, वाचा या बातमीमागील सत्य !

ही दिवसांपूर्वीच स्वयंघोषित फिल्म क्रिटिक कमाल राशिद खान ऊर्फ केआरके याने त्याचे बंद केलेले ट्विटर अकाउंट सुरू करा अन्यथा मी आत्महत्या करतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावर केआरकेने आत्महत्या केल्याची एकच अफवा पसरविली जात आहे. ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की, ‘केआरकेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेवर त्याला रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.’ ही अफवा सोशल मीडियावर सध्या वाºयासारखी पसरविली जात आहे. आता केआरकेने स्वत:च या अफवेचे खंडन केले असून, एक आॅडिओ मेसेज पोस्ट केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले की, ‘आय एम इन दुबई, काही विशेष आहे काय? फोन करू का तुम्हाला’!

त्याचे झाले असे की, केआरकेने काही दिवसांपूर्वी एक प्रेसनोट रिलीज करताना धमकी दिली होती की, पुढच्या पंधरा दिवसांत जर माझे अकाउंट सुरू केले गेले नाही तर मी आत्महत्या करणार. हे प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच नेहमीप्रमाणे केआरकेने त्याचा रिव्ह्यू ट्विटच्या माध्यमातून पोस्ट केला होता. त्याचदरम्यान त्याने चित्रपटाचा क्लायमॅक्सही रिलीज केला. ज्यामुळे त्याचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले. 



उपलब्ध माहितीनुसार, ‘सीक्रेट सुपरस्टार’चा क्लायमॅक्स रिव्हिल केल्यानंतर आमीर खानने त्याबाबतची रीतसर तक्रार केली होती. त्यानंतरच त्याचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले. केआरकेने सांगितले होते की, ‘मी आमीरच्या चित्रपटाचा निगेटिव्ह रिव्ह्यू लिहिला होता. त्यामुळेच माझे अकाउंट बंद करण्यात आले. मी ट्विटरवर गेल्या चार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आहे. माझे लाखो चाहते मला ट्विटरवर फॉलो करीत होते. त्यामुळेच मी ट्विटरच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. ट्विटरवर खर्च केलेल्या माझ्या वेळेचा मोबदला त्यांना मागणार आहे.’



केआरकेने हेदेखील म्हटले होते की, ‘मी माध्यमांना हे सांगू इच्छितो की, ट्विटरवर मी नवे अकाउंट सुरू करणार नाही. जर त्यांनी माझे अकाउंट आमीर खानच्या सांगण्यावरून बंद केले असेल तर जॅक डॉर्सी ट्विटरचा खरा मालक नसून, आमीर खान ट्विटरचा मालक आहे. केआरकेने त्याच्या बॉक्स आॅफिस अकाउंटवर लिहिले होते की, ‘मी कोणालाही शिवी दिली नाही. तसेच धमकीही दिली नाही. त्यामुळे ट्विटरला माझे अकाउंट सस्पेंड करण्याचा काहीही अधिकार नाही. दरम्यान, केआरकेचे ट्विटर अकाउंट बंद झाल्याने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: KKK has committed suicide, read or truth in the news!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.