केआरकेने पोटाचा कॅन्सर असल्याचा केला खुलासा; एक-दोन वर्षच आयुष्य शिल्लक असल्याचे केले स्पष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 19:43 IST2018-04-04T14:13:12+5:302018-04-04T19:43:19+5:30

प्रचंड वादग्रस्त असलेला स्वयंघोषित क्रिटिक्स आणि अभिनेता कमाल राशिद खान याने त्याच्या प्रकृतीविषयीचा खुलासा करताना ट्विटर एक पोस्ट शेअर ...

KKK disclosed that stomach has cancer; It is clear that life has been left for a year or two! | केआरकेने पोटाचा कॅन्सर असल्याचा केला खुलासा; एक-दोन वर्षच आयुष्य शिल्लक असल्याचे केले स्पष्ट!

केआरकेने पोटाचा कॅन्सर असल्याचा केला खुलासा; एक-दोन वर्षच आयुष्य शिल्लक असल्याचे केले स्पष्ट!

रचंड वादग्रस्त असलेला स्वयंघोषित क्रिटिक्स आणि अभिनेता कमाल राशिद खान याने त्याच्या प्रकृतीविषयीचा खुलासा करताना ट्विटर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये लिहिले की, मी आता जास्त काळ जगणार नाही. एक किंवा दोन वर्षच माझे आयुष्य राहिले आहे. आता उर्वरित काळ मी माझ्या परिवारासमवेत व्यतीत करू इच्छितो. केआरकेने त्याच्या आॅफिशिअल ट्विटर अकाउंट ‘केआरके बॉक्स आॅफिस’वर प्रेस रिलीज पोस्ट करताना ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून केआरके कुठल्याच प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसला नाही. त्याचबरोबर तो चित्रपटांपासूनही दूर आहे. 

त्याने ट्विटरवर लिहिले की, ‘ही बाब कन्फर्म झाली की, मला पोटाचा कॅन्सर असून, तो तिसºया स्टेजवर आहे. त्यामुळे मी आता केवळ एक किंवा दोन वर्षच जगू शकणार. आता मी त्या लोकांचे मनोरंजन करणार नाही, जे माझ्याबद्दल नेहमीच काही ना काही व्यक्त करीत असतात. मी कोणाची सहानुभूती मिळवून एक दिवसही जगू इच्छित नाही. मी त्या लोकांचे कौतुक करतो, जे माझा नेहमीच तिरस्कार करतात. मला शिवीगाळ करतात किंवा प्रेम करतात. मात्र मी माझ्या दोन इच्छांसाठी खूपच दु:खी आहे. कारण या इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही. 
 }}}} ">This is press release of #KRK about his health. pic.twitter.com/0UlscVD4wq— KRKBOXOFFICE (@KRKBoxOffice) April 3, 2018
केआरकेने आपल्या दोन्ही इच्छा ठळकपणे नमूद करताना लिहिले की, ‘माझी पहिली इच्छा ही आहे की, मला ए ग्रेड चित्रपटाचा निर्माता बनायचे होते. दुसरी इच्छा अमिताभ बच्चनसोबत काम करायचे होते किंवा त्यांचा एखादा चित्रपट प्रोड्यूस करायचा होता. आता या दोन्ही इच्छा माझ्यासोबतच या जगाचा निरोप घेणार आहेत. आता माझा उर्वरित संपूर्ण वेळ मी माझ्या परिवारासमवेत व्यतीत करू इच्छितो. सर्वांना माझे प्रेम... किंवा तुम्ही माझ्यावर प्रेम करा अन्यथा माझा तिरस्कार करा. केआरके. 

Web Title: KKK disclosed that stomach has cancer; It is clear that life has been left for a year or two!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.