​सलमान खानच्या ‘या’ चित्रपटांत दिसणार क्रिती सॅनन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 15:17 IST2017-04-02T09:47:04+5:302017-04-02T15:17:04+5:30

सलमान खानच नाही तर त्याची प्रॉडक्शन कंपनीही सध्या वाढते आहे. होय, ‘बजरंगी भाईजान’,‘हिरो’ आणि ‘ट्यूबलाईट’ हे तिन्ही चित्रपट सलमान ...

Kirsty Sanan appears in Salman Khan's 'These' films | ​सलमान खानच्या ‘या’ चित्रपटांत दिसणार क्रिती सॅनन!

​सलमान खानच्या ‘या’ चित्रपटांत दिसणार क्रिती सॅनन!

मान खानच नाही तर त्याची प्रॉडक्शन कंपनीही सध्या वाढते आहे. होय, ‘बजरंगी भाईजान’,‘हिरो’ आणि ‘ट्यूबलाईट’ हे तिन्ही चित्रपट सलमान खान फिल्म्सअंतर्गत तयार झालेत. ताज्या बातम्या मानाल तर सलमानच्या प्रॉडक्शन कंपनीने आता एकाचवेळी तीन चित्रपटांची योजना आखली आहे. अर्थात या तिन्ही चित्रपटांत सलमान खान नसणार तर या चित्रपटांसाठी सलमानला बॉलिवूडमधील यंग टॅलेन्टचा शोध आहे. यापैकी एका चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘जुगलबंदी’. सर्वप्रथम या चित्रपटासाठी जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव चर्चेत होते. मात्र यानंतर खुद्द सलमानने स्वत: या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल केले आणि आता एक नवी बातमी ऐकायला येतेय. ती म्हणजे, या चित्रपटासाठी आता क्रिती सॅनन हिला अप्रोच केले गेले आहे.



ALSO READ :  ​अंकितानंतर क्रिती सॅननसोबतही सुशांतसिंह राजपूतचे ब्रेकअप!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानला बºयाच दिवसांपासून क्रिती सॅननसोबत काम करण्याची इच्छा आहे. ‘सुल्तान’मध्येही क्रिती हीच सलमानची पहिली पसंत होती. पण ती या चित्रपटाचा भाग होता होता राहिली. याचे कारण म्हणजे यश राज बॅनर. ‘सुल्तान’सह क्रितीला आणखी तीन सिनेमे साईन करावे लागतील, अशी यशराजची अट होती. क्रितीने ही अट अमान्य केली. त्यामुळे ती या चित्रपटातून बाद झाली. केवळ ‘सुल्तान’च नाही तर ‘किक2’साठीही क्रितीचे नाव मध्यंतरी चर्चेत होते. पण तूर्तास तरी ही चर्चाच आहे. पण आता सलमानने ‘जुगलबंदी’सह त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या दोन चित्रपटांसाठी क्रितीला विचारणा केली आहे.
सध्या क्रिती ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात बिझी आहे. आयुष्यमान खुराणा यात तिचा हिरो आहे. याशिवाय क्रितीचा ‘राबता’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. यात क्रितीचा एक्स बॉयफ्रेन्ड(?) सुशांत सिंह राजपूत तिच्यासोबत दिसणार आहे.

Web Title: Kirsty Sanan appears in Salman Khan's 'These' films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.