वाद-विवादांचा किंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 00:33 IST2016-01-16T01:15:00+5:302016-02-13T00:33:53+5:30

शाहरुख खान आणि वादांचा संबंध तसा फार जुनाच आहे. आता त्याने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. आपल्या वाढदिवसाच्या ...

King of Controversy | वाद-विवादांचा किंग

वाद-विवादांचा किंग

हरुख खान आणि वादांचा संबंध तसा फार जुनाच आहे. आता त्याने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाहरुखने एका न्यूज चॅनला दिलेल्या मुलाखतीत देशत वाढणार्‍या असहिष्णुताबाबत जे विधान गेले त्याबाबत देशात मोठा हंगामा सुरू झाला आहे.

कोणी त्याला पाकिस्तानी एजंट म्हणत आहे तर कोणी त्याची तुलना हाफिज सईद सारख्या दहशतवाद्याशी केली आहे. हा वाद किती लांबेल, हे सांगणे कठीण आहे. शाहरुखच्या करिअरमध्ये असे अनेक प्रसंग आले की ज्यामुळे वाद निर्माण झाला. शाहरुख आणि त्या वादांवर एक नजर..

शिरीष कुंदरला थप्पड

shahrukh khan shirish kunder


संजय दत्त अभिनीत अग्निपथच्या यशाच्या पार्टीत फरहा खानचे पती शिरीष कुंदर यांना शाहरुख खानची चापट सहन करावी लागली. कारण आपल्या ट्विटर पोस्टमध्ये कुंदरने शाहरुख खानच्या रा-वन चित्रपटाला १५0 कोटींचा तमाशा म्हणून थट्टा केली होती. जी शाहरुख खानला आवडली नव्हती. त्याने थेट कुंदरच्या कानशीलात हाणली होती. 

सलमान खानसोबत भांडण

shahrukh khan salman khan

कैटरिना कैफच्या बर्थडे पार्टीमध्ये सलमानसोबत शाहरुख खानचे मोठे भांडण झाले आणि प्रसंग इतका गंभीर झाला की, दोघांमध्ये हाणामारीची वेळ आली. अनेक वर्षांपासून मित्र असलेल्या दोघांमध्ये मोठे वैमनस्य आले. अनेक वर्ष दोघं एकमेंकांवर टीका करायची एकही संधी सोडत नव्हते. दोन वर्षांपूर्वी ईदच्या मुहूर्तावर एका पार्टीमध्ये एकमेकांशी आणि अखेर हे भांडण मिटले. 

वानखेडेवरील धिंगाणा

shahrukh khan

आईपीएलच्या मॅचदरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या गेटवर शाहरुख खान आणि तेथे ड्यूटीवरील वॉचमॅन यांच्यात वाद झाला. ज्यात आणखी काही लोक सहभागी झाले आणि याला राजकीय रंग मिळत गेला. शाहरुख खानविरुद्ध पोलीस केस झाली आणि वानखेडे स्टेडियममध्ये त्याला प्रवेश बंदी करण्यात आली. नुकतीच ही बंदी उठवण्यात आली आहे. 

पाकिस्तानी खेळाडूंची केकेआरमध्ये एन्ट्री

Wasim


ज्यावेळी देशभरात पाकिस्तान विरोधात वातावरण वाढत होते, त्यावेळी शाहरुख खानने आईपीएलमध्ये आपली टीम कोलकाता नाईट राइडर्समध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळवले. यावरही वाद झाला झाला होता. तावात येऊन शिवसेनेने शाहरुख खानचा चित्रपट ‘माय नेम इज खान’च्या विरोधात आंदोलन केले. नंतर शाहरुखच्या टीममधून पाक क्रिकेट खेळाडू वेगळे झाले. वसीम अक्रम आतापर्यंत त्यांच्या टीमच्या सीनियर कोचपदी होते, मात्र त्यांनाही हटविण्यात आले.

जयपूरमध्ये स्मोकिंगमुळे वाद

shahrukh khan

आईपीएल दरम्यान जयपूरमध्ये शाहरुखला स्टेडियममध्ये उघडपणे सिगारेट पिताना पाहिले गेले. स्टेडियममध्ये स्मोकिंगवर पूर्णपणे बंदी असतानाही त्याने हा प्रकार केला. नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपात शाहरुखला दंडही ठोठावण्यात आला होता.

Web Title: King of Controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.