किडनी कॅन्सरने ग्रस्त आहेत दिग्दर्शक कल्पना लाजमी, सलमान खानने वैद्यकीय खर्चाची स्वीकारली जबाबदारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:07 IST2017-11-16T10:37:02+5:302017-11-16T16:07:02+5:30
६१ वर्षीय दिग्दर्शक तथा गुरुदत्त यांची भाची कल्पना लाजमी या किडनी कॅन्सरने ग्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात ...

किडनी कॅन्सरने ग्रस्त आहेत दिग्दर्शक कल्पना लाजमी, सलमान खानने वैद्यकीय खर्चाची स्वीकारली जबाबदारी!
६ वर्षीय दिग्दर्शक तथा गुरुदत्त यांची भाची कल्पना लाजमी या किडनी कॅन्सरने ग्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी कल्पना लाजमी यांच्या दोन्ही किडन्यांमध्ये त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असे सांगितले जात आहे की, कल्पना यांच्या रुग्णालयाचा संपूर्ण खर्च बॉलिवूडमधील अनेक स्टार्सकडून केला जात आहे. ज्यामध्ये आमिर खान, सलमान खान, रोहित शेट्टी, करण जोहर, आलिया भट्ट आणि नीना गुप्ता यांच्या नावांचा समावेश आहे.
‘रुदाली, दमन आणि दरमियान’ यांसारखे चित्रपट बनविणाºया कल्पना लाजमी यांच्या दोन्ही किडनींना कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजाराशी लढा देत आहेत. त्यांना एका आठवड्यात चार वेळा डायलिसिस करावे लागते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या त्यांची प्रकृती खूपच खालावलेली आहे. तसेच आर्थिक चाचणींचाही त्यांना सामना करावा लागत असल्याने, इंडस्ट्रीमधील काही मंडळींनी त्यांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे.
![]()
निर्माते अशोक पंडित यांच्या मते आमिर खान, सलमान खान, रोहित शेट्टी, करण जोहर, आलिया भट्ट, सोनी राजदान, नीना गुप्ता यांच्यासह इंडस्ट्रीमधील बरीचशी मंडळी त्यांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. सर्वच लोक त्यांना आर्थिक साहाय्य करीत आहेत. त्याचबरोबर शक्य होईल ती मदत त्यांना दिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच कल्पना लाजमी यांनी पीटीआयच्या माध्यमातून इंडस्ट्रीमधील त्यांना मदत करणाºया तमाम लोकांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे भाऊ, स्क्रीप्ट रायटर आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचेही आभार मानले.