"मी तुझे डायपर बदलते आणि तू...", कियारा अडवाणीची लेकीसाठीची पोस्ट चर्चेत! म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:37 IST2025-08-11T12:36:10+5:302025-08-11T12:37:12+5:30
कियारा अडवाणीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

"मी तुझे डायपर बदलते आणि तू...", कियारा अडवाणीची लेकीसाठीची पोस्ट चर्चेत! म्हणाली...
अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. कियारा आणि तिचा पती सिद्धार्थ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून घरी लक्ष्मीचं आगमन झाल्याची घोषणा केली होती. लेकीच्या आगमनाने मल्होत्रा आणि अडवाणी दोन्ही कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. अशातच कियारानं मुलीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
कियारा अडवाणीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले की, "मी तुझे डायपर बदलते आणि तू माझे जग बदलले आहे. हा एक योग्य व्यवहार आहे". या पोस्टमधून आई झाल्यानंतर कियारा अडवाणी आनंदात असल्याचं दिसून येतंय. चाहत्यांना तिची ही पोस्ट अत्यंत गोड आणि हृदयस्पर्शी वाटली.
कियाराच्या कामाबद्दल बोलायचं झालं असलं तरी तिचा 'वॉर २' हा चित्रपट चर्चेत आहे. ती लवकरच हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसोबत 'वॉर २'मध्ये दिसणार आहे. चित्रपट १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 'वॉर २'नंतर कियारा दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक'मध्ये झळकणार आहे. जो पुढील वर्षी मार्चमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. 'वॉर २' या सिनेमाचं शुटिंग कियारानं गरोदर होण्यापुर्वींचं पुर्ण केलं होतं. लेकीच्या जन्मानंतर आता कियारा पुन्हा कामावर कधी परतणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.