खान कुटुंबाची भावी सून? आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची आईशी करुन दिली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:23 IST2025-05-14T14:23:31+5:302025-05-14T14:23:47+5:30

Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. जेव्हापासून त्याने त्याच्या प्रेयसीची ओळख करून दिली आहे, तेव्हापासून ते दोघेही एकत्र दिसतात.

Khan family's future daughter-in-law? Aamir Khan introduces girlfriend Gauri Spratt to his mother | खान कुटुंबाची भावी सून? आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची आईशी करुन दिली ओळख

खान कुटुंबाची भावी सून? आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची आईशी करुन दिली ओळख

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. जेव्हापासून त्याने त्याच्या प्रेयसीची ओळख करून दिली आहे, तेव्हापासून ते दोघेही एकत्र दिसतात. आमिर आणि गौरी अनेकदा कुठेतरी एकत्र स्पॉट होतात. रविवारी, मदर्स डे निमित्त, आमिर खान त्याच्या आईला सरप्राईज देण्यासाठी गेला होता. गौरी देखील आमिरसोबत मदर्स डे सेलिब्रेशनमध्ये पोहोचली होती. गौरीचे कुटुंबासह फोटो व्हायरल होत आहेत.

आमिर खानच्या दोन्ही बहिणी झीनत आणि निखत देखील मदर्स डे सेलिब्रेशनमध्ये उपस्थित होत्या. कुटुंबातील फोटोमध्ये गौरी सर्वांसोबत उभी असल्याचे दिसत आहे आणि आमिरची आई केक कापत आहे. एका फोटोमध्ये आमिरची आई झीनत हुसेन दिसत आहे. त्यांच्यासमोर केक ठेवला आहे, ज्यावर आई लिहिलंय. टेबलावर भरपूर फुले आहेत आणि निखत हेगडे त्यांच्या शेजारी उभी आहे. दरम्यान, दुसऱ्या फोटोमध्ये झीनत हुसेन केक कापताना दिसत आहेत. या ग्रुप फोटोमध्ये आमिरची प्रेयसी गौरी स्प्रेट दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा क्रॉप शर्ट आणि काळी पँट परिधान केली आहे. मात्र, या फोटोमध्ये आमिर खान दिसत नाही. तो कुटुंबासह इतर फोटोंमध्ये दिसत आहे.

वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्याने नात्याबद्दल केला खुलासा
आमिर खानने त्याच्या वाढदिवशी त्याची प्रेयसी गौरी स्प्रेटची ओळख मीडियासमोर करून दिली. गौरी बंगळुरूची आहे आणि आमिर तिला २५ वर्षांपासून ओळखतो, पण गौरी मुंबईत आली. त्यानंतर दोघेही गेल्या दीड वर्षांपासून संपर्कात होते. आमिर खानचे दोनदा लग्न झाले आहे. त्याचे पहिले लग्न रीना दत्तासोबत होते आणि दुसरे लग्न किरण रावसोबत होते.

Web Title: Khan family's future daughter-in-law? Aamir Khan introduces girlfriend Gauri Spratt to his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.