KGF Song Gali Gali : सुपरस्टार यश कुमारसोबत थिरकली मौनी रॉय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 13:17 IST2018-12-13T13:16:41+5:302018-12-13T13:17:40+5:30
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मौनी रॉय जोरात आहे. होय, मौनीचे ‘केजीएफ’ या आगामी चित्रपटातील ‘गली गली’ हे आयटम साँग रिलीज झालेय. गेल्या अनेक दिवसांपासून मौनीचे चाहते या गाण्याची प्रतीक्षा करत होते.

KGF Song Gali Gali : सुपरस्टार यश कुमारसोबत थिरकली मौनी रॉय!
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मौनी रॉय जोरात आहे. होय, मौनीचे ‘केजीएफ’ या आगामी चित्रपटातील ‘गली गली’ हे आयटम साँग रिलीज झालेय. गेल्या अनेक दिवसांपासून मौनीचे चाहते या गाण्याची प्रतीक्षा करत होते. आज हे गाणे रिलीज झाले. या गाण्यात मौनीच्या अदा करिना कपूर, कॅटरिना कैफला लाजवणाºया आहेत. गाण्यात मौनी तीन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतेय. मौनीशिवाय कन्नड सुपरस्टार यश कुमार यात दिसतोय.
हे आयटम साँग एक पार्टी ट्रॅक आहे. १९८९ मध्ये आलेल्या ‘त्रिदेव’ या चित्रपटातील या गाण्याने त्याकाळी प्रचंड धूम केली होती. जॅकी श्रॉफ व संगीता बिजलानीवर ते चित्रित करण्यात आले होते. यश कुमारच्या ‘केजीएफ’ या चित्रपटात हे गाणे एका नव्या अंदाजात दिसणार आहे. तनिष्क बागचीने ते रिक्रिऐट केले आहे. ‘केजीएफ’ हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ व मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.
‘देवों का देव महादेव’ आणि ‘नागीन’ यासारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली छोट्या पडद्यावरची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय आता केवळ छोट्या पडद्यावरची अभिनेत्री राहिलेली नाही. गत स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्ताला मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’मधून तिचा डेब्यू झाला. ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी मौनी लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘गोल्ड’हातावेगळा केल्यावर मौनीची ‘ब्रह्मास्त्र’मध्ये वर्णी लागली. याशिवाय जॉन अब्राहमच्या ‘रॉ’आणि राजकुमारच्या ‘मेड इन चायना’ या चित्रपटातही ती दिसणार आहे.