अखेर तिढा सुटला, शाहरुख खानच्या चित्रपटासोबत रिलीज होणार नाही 'केदारनाथ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 11:49 IST2017-12-26T06:19:08+5:302017-12-26T11:49:08+5:30

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय ही बातमी आता संपूर्ण जगाला माहिती आहे. ...

'Kedarnath' will not be released with Shah Rukh Khan's film | अखेर तिढा सुटला, शाहरुख खानच्या चित्रपटासोबत रिलीज होणार नाही 'केदारनाथ'

अखेर तिढा सुटला, शाहरुख खानच्या चित्रपटासोबत रिलीज होणार नाही 'केदारनाथ'

फ अली खानची मुलगी सारा अली खान केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय ही बातमी आता संपूर्ण जगाला माहिती आहे. या चित्रपटाचे बजेट 7 कोटी आहे. याचित्रपटात तिच्या अपोझिट सुशांत सिंग राजपूत दिसणार आहे. मात्र या चित्रपटाच्या रिलीजवर काळे ढग जमा झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाचा दिग्दर्शिक अभिषेक कपूर आणि निर्मिती प्रेरणा अरोराच्या मध्ये चित्रपटाच्या रिलीज डेटला घेऊन वाद सुरु आहेत. केदारनाथची निर्मिती प्रेरणा अरोराला हा चित्रपट शाहरुख खानच्या चित्रपटासोबत रिलीज होऊन द्यायचा नाही आहे. तर दिग्दर्शक अभिषेक कपूरला चित्रपट शाहरुखसोबतच रिलीज करायचा आहे. मात्र आता या वाद संपला आहे. हा चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला रिलीज होणार आहे. त्यानंतर दोन आठवड्यांनी शाहरुखचा चित्रपट रिलीज होणार आहे. शाहरुखशी पंगा घ्यायला कुणीच तयार होत नाही.  

ALSO READ :   ‘केदारनाथ’च्या टीममध्ये धुसफूस! सारा अली खानच्या चिंतेत भर!!

हा चित्रपट २०१३ मध्ये ‘केदारनाथ’मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. सारा आपल्या पहिल्या चित्रपटाताला घेऊन एक्साइटेड आहे.केदारनाथमधून सैफ अली खान आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सिंगची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. 'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे आणि तीर्थयात्रेशी संबधित आहे  या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करते आहे.तसेच या चित्रपटासाठी सारा आणि सुशांतला तर याविषयी ट्रेनिंग दिले जात आहे, जेणेकरून शूटिंग करताना त्यांना कुठलीही दुखापत होऊ नये. 

Web Title: 'Kedarnath' will not be released with Shah Rukh Khan's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.