​‘केदारनाथ’च्या टीममध्ये धुसफूस! सारा अली खानच्या चिंतेत भर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 14:07 IST2017-12-24T08:37:31+5:302017-12-24T14:07:31+5:30

‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास तयार असलेली सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिचे ग्रह कदाचित ...

'Kedarnath' team smiles! Sara Ali Khan's concern in the whole !! | ​‘केदारनाथ’च्या टीममध्ये धुसफूस! सारा अली खानच्या चिंतेत भर!!

​‘केदारनाथ’च्या टीममध्ये धुसफूस! सारा अली खानच्या चिंतेत भर!!

ेदारनाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास तयार असलेली सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिचे ग्रह कदाचित ठीक नाहीयेत. होय, साराची सुरुवातचं काहीशा अडचणीत सापडली आहे.  आता या चित्रपटाच्या रिलीज डेटवरून निर्माता व दिग्दर्शकात खटपट सुरू असल्याची खबर आहे.
चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर, ‘केदारनाथ’चे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माती पे्ररणा अरोरा यांच्यात चित्रपटाच्या रिलीज डेटवरून मतभेद निर्माण झाले आहेत. शाहरूख खान स्टारर आणि आनंद एल राय दिग्दर्शित चित्रपटासोबत ( शाहरूखच्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.)‘केदारनाथ’ रिलीज व्हावा, असे अभिषेकचे मत आहे. याऊलट प्रेरणाला बॉक्सआॅफिसवर शाहरूखशी अजिबात पंगा नकोय. एकीकडे अभिषेक कपूर त्याचा चित्रपट शाहरूखच्या चित्रपटासोबतच रिलीज व्हावा, याबद्दल आग्रही आहे तर दुसरीकडे प्रेरणा हा बॉक्सआॅफिस संघर्ष टळावा म्हणून  शाहरूखची मनधरणी करताना दिसतेय.  या लढाईत कुणाचा विजय होतो, ते कळेलच. पण खरे सांगायचे तर  या सगळ्या प्रकारामुळे सारा अली खानच्या चिंतेत मात्र भर घातलीय. कारण  ‘केदारनाथ’चे शूटींग सुरु झाल्यापासून या ना त्या कारणाने या चित्रपटाचे शूटींग रखडते आहे. आधी हवामानामुळे ‘केदारनाथ’चे शूटींग रखडल्याची बातमी आली. नंतर या चित्रपटातील लीड हिरो सुशांत सिंग राजपूत याच्या   मूड स्विंगमुळे ‘केदारनाथ’चे शूटींग लांबल्याची चर्चा झाली. यापश्चात ‘केदारनाथमधील महाप्रलयाचा सीन मुंबईत रिक्रिएट करण्याचा निर्णय झाल्याने शूटींग लांबले.  इतके कमी की काय म्हणून आता रिलीज डेटवरून निर्माता आणि दिग्दर्शकामध्ये वाद रंगल्याची बातमी आहे.  

ALSO READ : ​ सारा अली खानला वाटू लागलीय जान्हवी कपूरची भीती? वाचा सविस्तर...

 ‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे.

Web Title: 'Kedarnath' team smiles! Sara Ali Khan's concern in the whole !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.