Amitabh Bachchan : क्या हम फालतू पिक्चर बनाते है? अमिताभ बच्चन असं का म्हणाले? पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 16:51 IST2022-09-07T16:50:26+5:302022-09-07T16:51:20+5:30
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन कोरोनातून बरे झाले आहेत आणि त्यांनी पुन्हा शूटींगही सुरू केलं आहे. पण याचदरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय...

Amitabh Bachchan : क्या हम फालतू पिक्चर बनाते है? अमिताभ बच्चन असं का म्हणाले? पाहा व्हिडीओ
Kaun Banega Crorepati 14: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कोरोनातून बरे झाले आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा ‘कौन बनेगा करोडपती 14’चं शूटींग सुरू केलं आहे. बिग बींचा हा शोमध्ये टेलिव्हिजनचा लोकप्रिय शो. शोमध्ये येणारे काही स्पर्धक आपल्या प्रतिभेने, ज्ञानाने प्रेक्षकांना थक्क करतात तर काही स्पर्धक आपल्या मजेशीर गप्पांनी लोकांचं मनोरंजन करतात. असाच एक स्पर्धक या शोमध्ये पोहोचला आणि त्याने जे काही सांगितलं ते ऐकून अमिताभ यांनी कपाळावर हात मारून घेतला. आम्ही इतके फालतु सिनेमे बनवतो का? असा प्रश्न अमिताभ यांना विचारायला या स्पर्धकाने भाग पाडलं. आता कसं तर हे तुम्हाला सोबत दिलेला प्रोमो पाहून लक्षात येईलच.
तर त्याचं झालं असं की, 6 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये भुवनेश्वरचे कृष्णा दास हॉट सीटवर बसले. हॉट सीटवर बसलेल्या कृष्णा यांच्याशी अमिताभ यांनी बऱ्याच गप्पा मारल्या आणि गप्पांच्या ओघात कृष्णा दास यांनी अमिताभ यांच्याकडे एक तक्रारही बोलून दाखवली. सर पत्नी की एक शिकायत है, वो कहती हैं कि मैं उन्हें प्यार नहीं करता..., असं कृष्णा दास अमिाभ यांना सांगतात. यावर अमिताभ यामागचं कारण विचारतात. यावर कृष्णा दास असं काही कारण सांगतात की, अमिताभ डोक्यावर हात मारून घेतात. ‘सर जब मैं आपकी एक फिल्म देखता हूं तो पत्नी बोलती है कि क्या फालतू पिक्चर देख रहे हो,’ असं कृष्णा दास म्हणतात आणि ते वाक्य ऐकून अमिताभ यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलतात.
मैं फिल्म का नाम नहीं बताऊंगा, असं कृष्णा म्हणतात. यावर लगेच, पहले ये बात मुझे हजम तो कर लेने दीजिए... असं म्हणत अमिताभ कृष्णा दास यांच्या पत्नीकडे कटाक्ष टाकतात. हम फालतू पिक्चर बनाते है? असं कृष्णा यांच्या पत्नीकडे पाहून ते विचारतात. अमिताभ यांचा हा प्रश्न ऐकून तिथे बसलेले प्रेक्षकही हसू लागतात.