आपल्या बॉयफ्रेन्डसोबत कॅटरिना कैफचा ‘रोमान्स’ दीपिका पादुकोण पाहु शकेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 14:27 IST2017-12-12T08:57:17+5:302017-12-12T14:27:17+5:30
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या पुढील चित्रपटात रणवीर सिंगची वर्णी लागली आहे, हे आम्ही तुम्हाला सांगितले आहेच. या चित्रपटाचे नाव आहे, ...

आपल्या बॉयफ्रेन्डसोबत कॅटरिना कैफचा ‘रोमान्स’ दीपिका पादुकोण पाहु शकेल?
द ग्दर्शक रोहित शेट्टीच्या पुढील चित्रपटात रणवीर सिंगची वर्णी लागली आहे, हे आम्ही तुम्हाला सांगितले आहेच. या चित्रपटाचे नाव आहे, ‘सिम्बा’. या चित्रपटाचा फर्स्ट लूक अलीकडेच रिलीज झाला होता. याचे पोस्टरही आम्ही आमच्या वाचकांना दाखवले होते. अर्थात ‘सिम्बा’मध्ये रणवीरची हिरोईन कोण असणार, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. हिरोईनच्या नावावर तूर्तास चर्चा सुरु आहे. आधी ‘सिम्बा’साठी सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिच्या नावाची चर्चा होती. यानंतर साराला पछाडत श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर या रेसमध्ये पुढे गेली. पण आता ताज्या चर्चेनुसार, सारा व जान्हवीला मागे टाकत कॅटरिना कैफ या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने ‘सिम्बा’साठी कॅटरिनाला अॅप्रोच केले आहे. आता कॅटरिनाने ही आॅफर मान्य केली की नाही, हे अद्याप कळलेले नाही. पण कॅटने ही आॅफर स्वीकारलीच तर रणवीर व कॅटरिना पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतील.
![]()
कॅट व रणवीरचा आॅनस्क्रीन रोमान्स रंगणार असेल तर या बातमीवर दीपिका पादुकोणची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणेही या निमित्ताने इटरेस्टिंग ठरणार आहे. कारण कॅट व दीपिका या दोघींमधील कोल्डवॉर तुम्हाला ठाऊक आहेच. दोघी एकमेकींकडे पाहणेही पसंत करत नाही. अशास्थितीत आपल्या बॉयफ्रेन्डसोबत कॅटचा रोमान्स दीपिका पाहु शकेल?
ALSO READ : OMG! दीपिका पादुकोणवर भारी पडली निया शर्मा!!
रणवीरआधी दीपिका रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण रणबीरने कॅटरिनासाठी दीपिकाला सोडले होते. ( पुढे कॅटरिना व रणबीर यांचेही ब्रेकअप झाले. ) तेव्हापासून दीपिका व कॅट या दोघींमध्ये बिनसले. अलीकडे शाहरूखच्या वाढदिवसाच्या पार्टीत कॅट व दीपिका दोघीही एकमेकांना टाळताना दिसल्या होत्या. त्यापूर्वी फिल्मफेअर ग्लॅमर अॅण्ड स्टाईल अवार्डमध्येही दोघींमधील अंतर स्पष्ट दिसले होते. म्हणूनच रणवीरसोबत कॅटला पाहून दीपिका कशी रिअॅक्ट होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.