​‘जग्गा जासूस’मध्ये अशी असेल कॅटरिना कैफची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 14:26 IST2017-06-26T08:56:26+5:302017-06-26T14:26:26+5:30

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ लवकरच ‘जग्गा जासूस’मध्ये दिसणार आहे. येत्या १४ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

Katrina Kaif's role in 'Jagga Detective' | ​‘जग्गा जासूस’मध्ये अशी असेल कॅटरिना कैफची भूमिका!

​‘जग्गा जासूस’मध्ये अशी असेल कॅटरिना कैफची भूमिका!

बीर कपूर आणि कॅटरिना कैफ लवकरच ‘जग्गा जासूस’मध्ये दिसणार आहे. येत्या १४ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी अनेकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबली.  ‘जग्गा जासूस’च्या शूटींगवेळी रणबीर व कॅटचे ब्रेकअप अगदी ताजेताजे होते. साहजिक शूटींगवेळी दोघेही एकमेकांसोबत अजिबात कम्फर्टेबल नव्हते. ‘जग्गा जासूस’ची रिलीज डेट लांबण्यामागे हेही एक कारण सांगितल्या जाते. अर्थात आता सगळे निवळले आहेत आणि ‘जग्गा जासूस’ची अख्खी टीम चित्रपट रिलीजच्या तयारीला लागली आहे. या चित्रपटात कॅटरिना कधी नव्हे अशा अवतारात दिसणार असल्याचे कळतेय.
होय, तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण ‘जग्गा जासूस’मधील भूमिकेसाठी कॅटरिनाने बरीच तयारी केली होती. कॅटरिना यात एका महिला पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार साकारण्यासाठी कॅटरिनाने अनेक महिने तयारी केली. ही भूमिका अधिकाधिक जिवंत वाटावी यासाठी तिची ही धडपड होती. तिने  पत्रकारांचे १०० तासांचे बिहाईन्ड कॅमेरा फुटेज बघितलेत. अनेक पत्रकारांना भेटली.  पत्रकाराचे पात्र असलेले काही सिनेमे पाहिलेत. शिवाय यासंदर्भातील काही पुस्तकेही वाचलीत. 
कॅटरिना कायम आपल्या चित्रपटांमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करत असते. या चित्रपटातही तिच्या अभिनयाचे असेच एखादे अनोखे अंग आपल्याला पाहायला मिळणार, यात शंका नाही.  इतकी मेहनत घेतल्यानंतर कॅटरिनाने पडद्यावर ही भूमिका कशी जिवंत केली असेल, हे बघण्याची उत्सुकता तुम्हाला असेलच. आम्हालाही ती आहेच. पण यासाठी आपल्याला काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या कॅटरिना ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहे. 

Web Title: Katrina Kaif's role in 'Jagga Detective'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.