कॅटरिना कैफने ‘या’ कपूरच्या चित्रपटाला दिला नकार, जाणून घ्या त्याचे नाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 22:21 IST2017-12-28T16:51:01+5:302017-12-28T22:21:01+5:30
काही दिवसांपूर्वीच ही बातमी समोर आली होती की, बॉलिवूडचा चॉकलेटी अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबत कॅटरिना कैफ ‘बत्ती गुल मीटर ...
.jpg)
कॅटरिना कैफने ‘या’ कपूरच्या चित्रपटाला दिला नकार, जाणून घ्या त्याचे नाव!
क ही दिवसांपूर्वीच ही बातमी समोर आली होती की, बॉलिवूडचा चॉकलेटी अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबत कॅटरिना कैफ ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटात काम करणार आहे. मात्र आता समोर येत असलेल्या वृत्तानुसार कॅटने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. असे म्हटले जात आहे की, चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीनारायण सिंगने कॅटरिना कैफला चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकविली. मात्र कॅटरिनाला ती अजिबातच पसंत आली नसल्याने तिने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. वास्तविक तिने नकाराचे कारण डेट्स नसल्याचे सांगितले. परंतु तिला स्क्रिप्टच पसंत आली नसल्याने तिने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला.
चित्रपटाशी संबंधित एका सोर्सने मिड-डेशी बोलताना सांगितले की, ‘चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका तेवढीच मजबूत आहे, जेवढी शाहिद कपूरची आहे. चित्रपटातील अभिनेत्रीला एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलावे लागणार आहे. कारण हा चित्रपट उत्तराखंडमध्ये सेट करण्यात आला आहे. जर कॅटरिनाने हा चित्रपट साइन केला असता तर तिला केवळ देसी अवतारच नव्हे, तर त्या अंदाजात बोलावेही लागणार होते. त्यामुळे या चित्रपटाच्या तयारीकरिता कॅटरिनाला काहीसा वेळ द्यावा लागणार होता. मात्र ती अगोदरच आनंद एल. राय यांच्या एका चित्रपटात आणि आमिर खानसोबत ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’मध्ये व्यस्त असल्याने तिने या चित्रपटाला नकार दिला आहे.
चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोराने सांगितले की, आम्ही कॅटरिनाला अॅप्रोच झालो होतो. कारण ती आमची फर्स्ट च्वॉइस होती. चित्रपटातील तिची भूमिका तिला आवडलीदेखील होती. परंतु ज्या तारखांमध्ये आमच्या चित्रपटाची शूटिंग करायची होती, त्याच तारखा तिने इतर चित्रपटांना दिल्या असल्याचे समोर आले. प्रेरणाच्या मते, ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट हिवाळ्यातच शूट करायचा आहे. त्याकरिता जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिनेही निश्चित करण्यात आले आहे. परंतु कॅटरिना मार्चपर्यंत फ्री नसल्याने आता दुसºया अभिनेत्रीचा शोध घ्यावा लागेल.