कॅटरिना कैफ इन्स्टावर तिच्या एक्स बॉयफ्रेण्डपासून राहणार चार हात लांब!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 20:15 IST2017-05-02T14:45:30+5:302017-05-02T20:15:30+5:30
अभिनेत्री कॅटरिना कैफ काही दिवसांपूर्वीच सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाली असून, काही तासांमध्येच तिच्या फॉलोअर्सची संख्या दहा हजारांपर्यंत ...
.jpg)
कॅटरिना कैफ इन्स्टावर तिच्या एक्स बॉयफ्रेण्डपासून राहणार चार हात लांब!!
अ िनेत्री कॅटरिना कैफ काही दिवसांपूर्वीच सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाली असून, काही तासांमध्येच तिच्या फॉलोअर्सची संख्या दहा हजारांपर्यंत गेली आहे. कॅटरिनाचा इन्स्टाग्राम डेब्यू प्रत्येकाला आवडला असून, बॉलिवूड सेलेब्सनी तिचे यासाठी स्वागतही केले आहे. त्याचबरोबर तो कोणाकोणाला फॉलो करू इच्छिणार अशी तिला विचारणादेखील केली जात आहे; मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना कॅटरिनाने आपला एक्स बॉयफ्रेण्ड रणबीर कपूर याला फॉलो करणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून खळबळ उडवून दिली आहे.
बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार कॅटरिनाने सांगितले की, ‘मी त्या सेलेब्सपैकी नाही, जे इन्स्टाग्रामवर स्टॉकरविषयी बोलतात; मात्र एक गोष्ट सांगाविशी वाटेल की, असे बरेचसे लोक आहेत, जे इन्स्टाग्रामवर कधीच समोर येत नाहीत. ते त्यांच्या सीक्रेट हॅण्डलवरून लोकांना स्टॉक करतात.’ कॅटरिनाचा हा इशारा पूर्णत: तिचा एक्स बॉयफ्रेण्ड रणबीर कपूर याच्याकडे असून, ती त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करणार नाही, हे जवळपास निश्चित समजले जाते.
काही दिवसांपूर्वीच रणबीरने राजीव मसंद याला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी फेसबुकवर नाही; मात्र इन्स्टाग्रामवर आहे. परंतु तेही प्रोफाइल अकाउंट माझ्या खºया नावाने नाही. कारण माझी पर्सनालिटीच अशी आहे की, मी लोकांसोबत मोकळ्यापणाने चॅट करू शकत नाही. त्याकरिता मी इन्स्टावर वेगळ्या नावाने प्रोफाइल बनविली आहे. आता रणबीरच्या या खुलाशाला तंतोतंत टोमणा बसेल असे वक्तव्य कॅटरिनाने केले आहे.
![]()
असो. सध्या कॅटरिना तिच्या नव्या अॅडिक्शनचा खुल्लमखुल्ला एन्जॉय करीत आहे. शिवाय ती तिच्या आगामी चित्रपटांचे या सोशल नेटवर्किंग साइटवर प्रमोशन करतानाही दिसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि कॅटचा एक फोटो व्हायरल झाला होता, या फोटोमध्ये रणबीर आणि कॅट हातात-हात घेऊन बघावयास मिळाले होते. शिवाय ब्रेकअपनंतर या दोघांनी एक सेल्फीही काढला होता. हा सेल्फी इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला होता.
सध्या कॅटरिना तिच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिचा एक्स बॉयफ्रेण्ड सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. लवकरच या चित्रपटाची शूटिंग अबुधाबीमध्ये सुरू केले जाणार असून, ६५ दिवसाचे शेड्यूल्ड असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे सलमान आणि कॅटरिनाला पुढचे ६५ दिवस एकत्र घालवावे लागतील. हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सिक्वल असून, यामध्ये प्रेक्षकांना तुफान अॅक्शन बघावयास मिळणार आहे.