तर रणबीर कपूरच्या प्रेमात वेडी झाली होती कॅटरिना कैफ.. अनेक चित्रपटांना लांबूनच केले होते बाय-बाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 13:30 IST2017-10-09T08:00:13+5:302017-10-09T13:30:13+5:30

बी-टाऊनमध्ये अनेक कलाकारांच्या अफेअरची चर्चा नेहमीच होत असते. ब्रेकअपनंतर ही त्यांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच होत असते. अशीच एक जोडी ...

Katrina Kaif, who had gone crazy in Ranbir Kapoor's love story. | तर रणबीर कपूरच्या प्रेमात वेडी झाली होती कॅटरिना कैफ.. अनेक चित्रपटांना लांबूनच केले होते बाय-बाय

तर रणबीर कपूरच्या प्रेमात वेडी झाली होती कॅटरिना कैफ.. अनेक चित्रपटांना लांबूनच केले होते बाय-बाय

-टाऊनमध्ये अनेक कलाकारांच्या अफेअरची चर्चा नेहमीच होत असते. ब्रेकअपनंतर ही त्यांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच होत असते. अशीच एक जोडी आहे बॉलिवूडमध्ये ज्यांच्या अफेअरचा चर्चा आजही होते त्यांचे नाव आहे कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर. दीपिका पादुकोणनंतर रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफच सगळे काही होती. एक इटंरव्ह्यु रणबीर कपूर म्हणाला होता की, माझ्या आई-वडिलांनानंतर कॅटरिनाच अशी व्यक्ती होती जी माझ्या आयुष्याचा भाग बनली होती आणि मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी प्रेरणा द्यायची.  मात्र यानंतर जे घडले ते सगळ्यांना माहिती आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का रणबीर कपूरमुळे कॅटरिना कैफने अनेक चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.  

त्यावेळी कॅटरिना कैफ आणि रणबीपर कपूरच्या अफेअरची चर्चा कॉमन होती. रणबीरने कॅटरिना कैफला आपल्या आई-वडिलानंतरची महत्त्वाची आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हटले होते. दररोज दोघांच्या रिलेशनशीपबाबत नव्य गोष्टी समोर यायच्या. तेव्हा एक प्रश्न विचारण्यात आला होता की या रिलेशमशीपमध्ये कोणीचे किती योगदान आहे. तेव्हा कॅटरिना म्हणाली होती रणबीरने या रिलेशनशीपमध्ये काही नाही दिले. कॅटरिना म्हणाली होती की, मी या रिलेशनशीपला खूप वेळ दिला मात्र रणबीर कपूरने काहीच दिले नाही. मीडिया रिपोर्टनुसार कॅटरिनाने सांगितले होते की मी या रिलेशनशीपला वेळ देण्यासाठी मी कमी चित्रपट साईन करायचे. अनेक चित्रपटांना नकार ही दिला. मात्र रणबीरमध्ये नात्याला घेऊन त्याग करण्याची भावना कुठेच नव्हती.

Also Read :  तर हा अभिनेता ठरला कॅटरिना कैफसाठी लकी चार्म ! वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकि

कॅटरिना आणि रणबीरच्या ब्रेकअपनंतर जग्गा जासूस चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. याचित्रपटाची निर्मिती ही रणबीर कपूरने केली होती. नुकतीच कॅटरिनाने सलमान खानसोबत टायगर जिंदा है चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. हा चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा चित्रपट एक था टायगर है चा सीक्वल आहे. तसेच कॅटरिना अमिताभ बच्चन आणि आमीर खानसोबत ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये सुद्धा झळकणार आहे. 

Web Title: Katrina Kaif, who had gone crazy in Ranbir Kapoor's love story.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.