ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये कॅटरिना कैफ नाही आमिर खानची हिरोईन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 17:12 IST2017-10-13T11:42:51+5:302017-10-13T17:12:51+5:30

आमिर खानचा आगामी चित्रपट सीक्रेट सुपरस्टार रिलीज साठी तयार आहे.दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा हा चित्रपट चित्रपटगृहात धमाका करायला तयार आहे. ...

Katrina Kaif is not Aamir Khan's heroine in Thugs of India | ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये कॅटरिना कैफ नाही आमिर खानची हिरोईन !

ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये कॅटरिना कैफ नाही आमिर खानची हिरोईन !

िर खानचा आगामी चित्रपट सीक्रेट सुपरस्टार रिलीज साठी तयार आहे.दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा हा चित्रपट चित्रपटगृहात धमाका करायला तयार आहे. सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटाची कथा एका छोट्या मुलीच्या सिंगिंग करिअरवर आधारित आहे. तिला तिचा आवाज जगासमोर पोहोचवायचा असतो; मात्र वडिलांचा विरोध असल्यामुळे तिला याकरीता लढा द्यावा लागतो. तेथूनच तिचा संघर्ष सुरू होतो. पुढे ती सुपरस्टार बनते. या छोट्या मुलीच्या भूमिकेत जायरा वसीम बघावयला मिळणार आहे. तर यात आमीर खान चित्रपटात सुपरस्टारच्या भूमिकेत असून, त्याचे नाव शक्ती असते. त्याचबरोबर तो यशराज प्रोडक्शन निर्मिती ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  

यात आमीरखान बरोबर अमिताभ बच्चन,  कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनविल्या जात असलेल्या या चित्रपटाला यशराज फिल्म्स प्रोड्यूस करीत आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटात आमीर खान आणि महानायक अमिताभ बच्चन पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करीत आहे. या अगोदर हे दोघे एकदाही चित्रपटात झळकले नाहीत.

ALSO READ :  आमिर खानला लिहायचेयं आत्मचरित्र; पण आहे एक अट!
 

आता या चित्रपटाला घेऊऩ आणखीन एक नवा खुलासा झाला आहे. जो ऐकून कदाचित कॅटरिना कैफला वाईट वाटू शकते. सीक्रेट सुपरस्टारच्या प्रमोशन दरम्यान आमिर खानने सांगितले, फातिमा सना शेख यात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. कॅटरिना कैफ या चित्रपटात फक्त काही गाण्यांसाठी आहे. कॅटरिना कैफ ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये अभिनेत्री नाही आहे. याचा अर्थ धूम 3 मध्ये आमिर आणि कॅटरिनाच्या जोडीने जी धमाल केली होती ती ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये नाही दिसणार.   
ठग्स ऑफ हिंदुस्ताननंतर आमिर खान सैल्यूट चित्रपटात दिसणार असल्याचे कळते आहे. यात तो अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारतो आहे. याचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. यात आमिरच्या पत्नीची भूमिका प्रियांका चोप्रा साकारणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे प्रियांका चोप्राने हा चित्रपटात साईन केला असले तर पहिल्यांदाच आमिर खान आणि प्रियांकाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.  

Web Title: Katrina Kaif is not Aamir Khan's heroine in Thugs of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.