कॅटरिना कैफने इन्स्टावर शेअर केला रेड बिकिनीतील सिजलिंग फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 19:45 IST2017-07-29T14:13:21+5:302017-07-29T19:45:29+5:30

बॉलिवूडची दीवा कॅटरिना कैफ इंडस्ट्रीमधील मोस्ट गॉर्जियस अभिनेत्रींपैकी एक आहे. कॅटच्या अदा घायाळ करणाºया असल्याने तिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वत:ची ...

Katrina Kaif has shared the red bikini seagulled photo !! | कॅटरिना कैफने इन्स्टावर शेअर केला रेड बिकिनीतील सिजलिंग फोटो!!

कॅटरिना कैफने इन्स्टावर शेअर केला रेड बिकिनीतील सिजलिंग फोटो!!

लिवूडची दीवा कॅटरिना कैफ इंडस्ट्रीमधील मोस्ट गॉर्जियस अभिनेत्रींपैकी एक आहे. कॅटच्या अदा घायाळ करणाºया असल्याने तिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅट सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाल्याने अधूनमधून ती तिच्या सौंदर्याची झलक तिच्या चाहत्यांना दाखवित असते. कॅटने असाच एक सिजलिंग फोटो सोशल अकाउंटवर पोस्ट केला असून, त्यामध्ये कॅट खूपच सुंदर दिसत आहे. 

बीचवर उभी असलेली कॅट लाल रंगाच्या टू पीस बिकिनीमध्ये बघावयास मिळत आहे. फोटोत कॅट खूपच हॉट अ‍ॅण्ड सेक्सी दिसत आहे. कॅटचा नुकताच ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट रिलीज झाला असून, बॉक्स आॅफिसवर चित्रपट प्रभाव टाकण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. चित्रपटात कॅट एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरच्या अपोझिट होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांचे ब्रेकअप झाले होते. त्यामुळे शूटिंगमध्ये अनेक अडथळेही निर्माण झाले. एका पाठोपाठ अनेक अडथळ्यांचा सामना केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी हा चित्रपट रिलीज केला गेला. परंतु चाहत्यांनी चित्रपट सपशेल नाकारल्याने, रणबीर कपूर खूपच नाराज झाल्याचे समजते. 

ALSO READ : केवळ १७ महिन्यांत कॅटरिना कैफचे चार चित्रपट होणार रिलीज; वाचा यादी!!

मात्र कॅटने चित्रपटाचे फारसे दु:ख न व्यक्त करता आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त होणे पसंत केले. सध्या कॅटकडे प्रचंड काम असून, त्यात ती व्यस्त आहे. विशेष म्हणजे तिन्ही सुपरस्टार खानबरोबर कॅट सध्या काम करीत आहे. ‘टायगर जिंदा हैं’च्या शूटिंगसाठी ती सलमानसोबत मोराक्को येथे होती. कालच सलमान शूटिंग पूर्ण करून मुंबईत परतला आहे. मात्र कॅट इतर प्रोजेक्टसाठी विदेशातच असल्याचे समजते. 

ALSO READ : कॅटरिना कैफने काय म्हटले असावे, ज्यामुळे एक्स बॉयफ्रेंड सलमान खानने तोंड लपविले!

चित्रपटांबरोबरच कॅट इतरही प्रोजेक्टवर काम करीत आहे. काही दिवसांपूर्वीच तिला इंटरनॅशनल फॅशन फोटोग्राफर मारियो टेस्टिनोच्या आयकॉनिक टॉवेल सिरीजमध्ये पोज देण्याची संधी मिळाली होती. या सिरीजमध्ये सहभागी झालेली कॅटरिना कैफ पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. दरम्यान, कॅटने शेअर केलेल्या या फोटोला सध्या तिच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कॅटने फोटो शेअर करताच त्याला तुफान लाइक्स आणि कॉमेण्ट्स मिळत आहेत. 

Web Title: Katrina Kaif has shared the red bikini seagulled photo !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.