​ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी कॅटरिना कैफही बनणार ‘परफेक्ट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 12:10 IST2017-07-05T06:40:23+5:302017-07-05T12:10:23+5:30

आमिर खान आपल्या कामात किती परफेक्ट आहे, हे आपण सगळेच जाणतो. चित्रपट कुठलाही असो, स्वत:च्या भूमिकेत जीव ओतरण्यासाठी आमिर ...

Katrina Kaif to become 'perfect' for 'Thugs of Hindostan' | ​ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी कॅटरिना कैफही बनणार ‘परफेक्ट’!

​ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी कॅटरिना कैफही बनणार ‘परफेक्ट’!

िर खान आपल्या कामात किती परफेक्ट आहे, हे आपण सगळेच जाणतो. चित्रपट कुठलाही असो, स्वत:च्या भूमिकेत जीव ओतरण्यासाठी आमिर नाही, नाही ते प्रयोग करत असतो. आता कॅटरिना कैफ ही सुद्धा आमिरच्या मार्गावर चालण्यास तयार आहे. असे आम्ही यासाठी म्हणतोय, कारण आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कॅटरिना महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटात कॅटरिना एका राजकुमारीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात कॅट अगदी आगळ्या-वेगळ्या अवतारात दिसणार आहे. कशी? तर तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कॅटरिनाची फार मोठी भूमिका नाही. ती एका शूर राजकुमारीच्या भूमिकेत आहे. एखाद्या योद्धयाला लाजवेल, असा तिचा रूबाब असणार आहे. यासाठी कॅटरिनाने तयारी सुरु केली आहे. चित्रपटात कॅट राजस्थानी लूकमध्ये दिसेल. त्यामुळे कॅटच्या नाकात मोठी नोझ रिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आता यासाठी कॅटरिना नाक टोचेल की नाही, हे अद्याप कळलेले नाही. कारण आमिर खानने स्वत: आपल्या भूमिकेसाठी शरिरातील अनेक भागांवर टोचून घेतले आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कॅटरिनाच्या डोळ्यांवरही खूप काम केले जाणार आहे. यात तिचे डोळे एकदम ‘नशीले’ असतील. डोळे, ज्यात अनेक रहस्ये दडलेली असतील, या डोळ्यांत पाहिल्यानंतर कुणीही हरवेल. चित्रपटात कॅटरिना राजस्थानी पारंपारिक वेषात दिसेल. घाघरा चोलीसारख्या तिच्या पोशाखाचा रंग ब्रॉऊन असू शकतो. एकंदर काय, तर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील कॅटरिनाची भूमिका लहान पण एकदम हटके असणार आहे. या चित्रपटात आमिर व कॅटरिना यांच्याशिवाय अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

ALSO READ : ​‘जग्गा जासूस’मध्ये अशी असेल कॅटरिना कैफची भूमिका!
 

Web Title: Katrina Kaif to become 'perfect' for 'Thugs of Hindostan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.