‘जग्गा जासूस’च्या ‘किस पोस्टर’मुळे कॅटरिना कैफ नाराज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 11:03 IST2017-04-06T05:33:14+5:302017-04-06T11:03:14+5:30

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ या दोघांचा ‘जग्गा जासूस’ पाहण्यास आपण जितके उत्सूक आहोत, तितकाच हा चित्रपट लांबतो आहे. ...

Katrina Kaif angry with Jagga Jupiter's 'Kiss Poster'! | ‘जग्गा जासूस’च्या ‘किस पोस्टर’मुळे कॅटरिना कैफ नाराज!

‘जग्गा जासूस’च्या ‘किस पोस्टर’मुळे कॅटरिना कैफ नाराज!

बीर कपूर आणि कॅटरिना कैफ या दोघांचा ‘जग्गा जासूस’ पाहण्यास आपण जितके उत्सूक आहोत, तितकाच हा चित्रपट लांबतो आहे. कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूरचे ब्रेकअप झाले. पण याऊपरही व्यावसायिक कारणाने का असेना कॅट व रणबीर ‘जग्गा जासूस’ च्या निमित्ताने एक आले. अनुराग बसूच्या या चित्रपटाचे धडाक्यात शूटींग सुरु झाले खरे. पण तेव्हापासून आजपर्यंत चित्रपटाशी संबंधित रोज नवा वाद कानावर पडू लागला. कधी कॅट व रणबीर सेटवर एकमेकांशी जुळवून घेऊ शकत नसल्याचे, कानावर आले तर कधी अनुराग बसूंच्या मनासारखा चित्रपट तयार झाला नसल्याचेही ऐकू आले. इतकेच नाही तर कॅटरिनाकडे डेट्स नसल्याने चित्रपट लांबल्याचेही समजले. आता असाच एक वाद कानावर येऊ लागला आहे. होय, कॅटरिना अनुरागवर प्रचंड नाराज असल्याचे कळतेय. यामागे कारण आहे, रणबीरला कॅट किस करतानाचे एक पोस्टर.

ALSO READ : WATCH जग्गा जासूस ट्रेलर : रणबीर कपूरचा हा सर्वोत्तम चित्रपट ठरेल का?

‘जग्गा जासूस’च्या एका पोस्टरवर कॅटरिना तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला किस करत असताना दाखवले आहे. कॅटरिनाला म्हणे, हे पोस्टर जराही आवडलेले नाही. हे पोस्टर रिलीज केले जाऊ नये, असे तिचे मत आहे आणि तिने अनुरागला तसे बोलूनही दाखवले आहे. केवळ एवढेच नाही तर ‘जग्गा जासूस’चे यापुढचे सगळे पोस्टर्स मला दाखवूनच रिलीज व्हावेत, असे कॅटचे म्हणणे आहे. अनुरागला कॅटचा हा तोरा आवडला नाहीच. त्यामुळे दोघांमध्ये सध्या तणफण सुरु असल्याचे कळतेय. आता हा वाद कसा निकाली निघतो, ते बघूच! ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात एकूण २९ गाणी आहेत. अलीकडे कॅट व रणबीरने यापैकी काही गाण्यांचे शूटींग पूर्ण केले. आता हा चित्रपट लवकरच रिलीज व्हावा, इतकीच अपेक्षा करू यात!

Web Title: Katrina Kaif angry with Jagga Jupiter's 'Kiss Poster'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.