कॅटरिना कैफच्या कडेवर असलेला ‘तो’ मुलगा कोणाचा?, खेळणेही दिले घेऊन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 17:05 IST2017-10-28T11:35:31+5:302017-10-28T17:05:53+5:30

सोशल मीडियावर सध्या कॅटरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, यामध्ये तिच्या कडेवर एक गोंडस मुलगा दिसत आहे. वाचा सविस्तर!

Katrina is on the edge of Kaif, 'he' who is the son? | कॅटरिना कैफच्या कडेवर असलेला ‘तो’ मुलगा कोणाचा?, खेळणेही दिले घेऊन!

कॅटरिना कैफच्या कडेवर असलेला ‘तो’ मुलगा कोणाचा?, खेळणेही दिले घेऊन!

लिवूडची हॉट अभिनेत्री कॅटरिना कैफ लवकरच अभिनेता सलमान खान याच्याबरोबर ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मात्र याचदरम्यान, कॅटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ती या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. कारण व्हिडीओमध्ये कॅटरिनाच्या कडेवर एक लहान मुलगा दिसत असून, ती त्याच्यासोबत शॉपिंगचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडीओ एका विमानतळावरील मॉलमधील आहे. ज्याठिकाणी कॅट त्या गोंडस मुलाला एक खेळणे खरेदी करून देत आहे. शिवाय त्याचा लाडही करीत आहे. कॅट त्या मुलाला विचारत आहे की, तुला कोणते खेळणे पसंत आहे?

कॅटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओला केवळ तिचे चाहतेच पसंत करीत आहेत असे नाही, तर सेलिब्रिटीही कॉमेण्ट देत आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने कॅटच्या या व्हिडीओला कॉमेण्ट देताना म्हटले की, ‘सगळं काही खरेदी कर, किमतीवरून हुज्जत का घालत आहेस?’ त्यावर कॅटरिनाने उत्तर दिले की, ‘आपल्याला पैशांचे मोल समजायला हवे.’ दरम्यान, कॅटरिनाच्या चाहत्यांकडून त्या मुलाबद्दल तिला विचारले जात आहे. चाहते तिला वारंवार विचारत आहेत की, तो मुलगा तुझा कोण? परंतु याचे अद्यापपर्यंत उत्तर मिळाले नसल्याने चाहत्यांसाठी एकप्रकारचे कोडे निर्माण झाले आहे. कदाचित तो गोंडस चिमुकला त्यांच्या चित्रपटाच्या टीममधील कोणाचा तरी मुलगा असावा असाही अंदाज लावला जात आहे. 
 

दरम्यान, कॅटरिनाचा आगामी ‘टायगर जिंदा हैं’ हा चित्रपट २०१२ मध्ये कबीर खान दिग्दर्शित ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ज्यामध्ये सलमान आणि कॅटरिनाने जासूसची भूमिका साकारली होती. या चित्रपटातदेखील दोघे जासूसच्याच भूमिकेत बघावयास मिळणार असून, तुफान अ‍ॅक्शन करताना दिसतील. त्यांचा हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. 

Web Title: Katrina is on the edge of Kaif, 'he' who is the son?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.