​ कॅटमुळे वाढलीय का यूलियाची चिंता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 16:33 IST2016-09-20T11:03:49+5:302016-09-20T16:33:49+5:30

कॅटरिना कैफ आणि सलमान खान लवकरच अली अब्बास जफरच्या ‘टायगर जिंदा है’मध्ये एकत्र दिसणार आहेत. सलमान आणि कॅटरिनाची दीर्घकाळापासून ...

Katia has increased due to the concern of Uliya? | ​ कॅटमुळे वाढलीय का यूलियाची चिंता?

​ कॅटमुळे वाढलीय का यूलियाची चिंता?

टरिना कैफ आणि सलमान खान लवकरच अली अब्बास जफरच्या ‘टायगर जिंदा है’मध्ये एकत्र दिसणार आहेत. सलमान आणि कॅटरिनाची दीर्घकाळापासून असलेली बॉन्डिंग या चित्रपटाच्या निमित्ताने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेही अशावेळी जेव्हा यूलिया वेंटर भारतात नाही. त्याची चर्चा आताश: कानावर पडू लागली आहे. सलमान व कॅटच्या वाढत्या जवळीकीमुळे यूलियाला असुरक्षित वाटू लागले असल्याची खबरही अलीकडे कानावर आली होती. पण सूत्रांचे मानाल या बातमीत जराही दम नाही. सलमान व कॅटच्या मैत्रीमुळे यूलिया जराही चिंतीत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅटरिनाची सलमानच्या आयुष्यातील एन्ट्रीमुळे (मैत्रिण म्हणून वा सहकलाकार म्हणून) यूलियाला काहीही फरक पडलेला नाही. सलमानच्या बांद्रास्थित गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये अलीकडेच यूलिया व कॅटरिनाची भेट झाली. या भेटीत यूलिया व कॅट परस्परांशी अतिशय आपुलकीने, प्रेमाने वागताना दिसले. तूर्तास तरी रोमानियन ब्युटी यूलियाला कॅटबद्दल काहीही तक्रार नाही. सलमान व कॅटच्या एकत्र स्क्रीन शेअर करण्याबद्दलही तिचा काही आक्षेप नाही. उलट कॅट व सलमानच्या मैत्रीमुळे ती आनंदी आहे. आता यूलिया आनंदात आहे म्हटल्यावर, सगळेच आनंदात. होय ना!!

Web Title: Katia has increased due to the concern of Uliya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.