वाढदिवसाच्या दिवशी कार्तिक आर्यन पोहचला सिद्धिविनायक मंदिरात; बाप्पाचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 07:12 PM2023-11-22T19:12:50+5:302023-11-22T19:25:04+5:30

 मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिरात जाऊन कार्तिकने बाप्पाचे दर्शन घेतले आहे. 

Kartik Aaryan visits Siddhivinayak Temple to seek blessings on 33rd birthday | वाढदिवसाच्या दिवशी कार्तिक आर्यन पोहचला सिद्धिविनायक मंदिरात; बाप्पाचं घेतलं दर्शन

वाढदिवसाच्या दिवशी कार्तिक आर्यन पोहचला सिद्धिविनायक मंदिरात; बाप्पाचं घेतलं दर्शन

बॉलिवूडमध्ये कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या कार्तिक आर्यनचा आज ३३ वा वाढदिवस आहे. आज संपूर्ण कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. आपल्या वाढदिवसाचे निमित्तसाधून  मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिरात जाऊन कार्तिकने बाप्पाचे दर्शन घेतले आहे. 

कार्तिकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कार्तिक आर्यन यावेळी निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसला आहे. त्याला पाहताच मंदिराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. यावेळी त्याने चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले.

बॉलिवूडमध्ये कार्तिकची सध्या चांगलीच चलती आहे.' 2011 मध्ये प्यार का पंचनामा; सिनेमातून कार्तिकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  यानंतर त्याने लुका छुपी, भूलभुलैया 2, सोनू के टीटू की स्वीटी, आकाश वाणी, गेस्ट इन लंडन आणि सत्यप्रेम की कथा या सिनेमांमधून त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

कार्तिक आता 'चंदू चॅम्पियन' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. मुरलीकांत पेटकर हे सुवर्णपदक विजेते असून त्यांनी 1972 मध्ये जर्मनी येथे झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट 14 जून 2024 पर्यंत रिलीज होऊ शकतो.  

Web Title: Kartik Aaryan visits Siddhivinayak Temple to seek blessings on 33rd birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.