९०च्या दशकातील दिसण्यासाठी कार्तिक आर्यनने घटविले तब्बल ८ किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 17:58 IST2020-01-29T17:58:13+5:302020-01-29T17:58:40+5:30
कार्तिक आर्यनने डाएटच्या माध्यमातून ८ किलो वजन कमी केले आहे.

९०च्या दशकातील दिसण्यासाठी कार्तिक आर्यनने घटविले तब्बल ८ किलो वजन
प्रत्येक कलाकार एखादी भूमिका साकारण्याआधी खूप मेहनत घेत असतो. त्या भूमिकेसाठी तो कोणतंही आव्हान स्वीकारण्यासाठी तयार असतो. त्यासाठी मग तो वजन घटवायला किंवा वाढवायला आणि बाल्ड लूक करायलाही तयार असतो. तसेच अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी चित्रपट लव आज कलसाठी केलं आहे. त्याने या चित्रपटासाठी तब्बल ८ किलो वजन घटविले आहे. त्याने या चित्रपटातील भूमिकेसाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही.
खरेतर लव आज कलमध्ये दोन काळ दाखवण्यात आले आहेत. त्यातील नव्वदच्या काळातील दिसण्यासाठी म्हणजेच एकदम तरूण दिसण्यासाठी कार्तिकला वजन घटविण्याची गरज होती आणि तो लगेच तयारही झाला. या चित्रपटात तो रघु व वीर अशा दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. रघु ९०च्या काळातील आहे. तर वीर आताच्या जमान्यातील आहे. अशात दोन्ही भिन्न पात्र असल्यामुळे दिग्दर्शक इम्तियाज अलीने कार्तिकला वजन घटवायला सांगितले. रघु हे पात्र स्कूल गोइंग बॉय आहे. त्यामुळे या लूकसाठी कार्तिकने कोणतीही कसर सोडली नाही. त्याने वजन घटविले सोबतच हेअर स्टाईलही बदलली.
कार्तिकने रघुच्या पात्रासाठी स्ट्रिक्ट डाएट फॉलो केले आणि जवळपास ८ किलो वजन घटविले आहे.
त्याने नुकताच एक सेटवरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात कार्तिक इतर सहकलाकारांसोबत शाळेच्या गणवेशात पोझ देताना दिसतो आहे.
लव आज कलचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील कार्तिक आर्यन व सारा अली खानची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे.
त्यामुळे त्यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.