कार्तिक आर्यनला लागली लॉटरी; मिळाला सर्वात मोठा प्रोजेक्ट, 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:28 PM2022-07-18T16:28:23+5:302022-07-18T16:38:26+5:30

कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या यशानंतर कार्तिकने एक मोठा चित्रपट साइन केला आहे.

Karthik Aaryan got biggest project, will work with sajid Nadiadwala and director kabir khan | कार्तिक आर्यनला लागली लॉटरी; मिळाला सर्वात मोठा प्रोजेक्ट, 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम

कार्तिक आर्यनला लागली लॉटरी; मिळाला सर्वात मोठा प्रोजेक्ट, 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम

googlenewsNext

अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) नुकताच 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2)  चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर उत्कृष्ठ कामगिरी केली. या चित्रपटानंतर आता कार्तिकच्या हातात आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट लागला आहे. चित्रपट निर्माते साजिद नाडियादवाला (SajidNadiadwala) यांच्या चित्रपटात कार्तिक दिसणार असून, 'बजरंगी भाईजान', '83', आणि 'एक था टायगर' सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक कबीर खान (KabirKhan) चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

कार्तिकच्या हाती मोठा चित्रपट
'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या यशानंतर कार्तिकने एक मोठा चित्रपट साइन केला आहे. बॉलीवूड निर्माते साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी कार्तिक आर्यनला साइन केले आहे. हा कार्तिकचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट असणार आहे. या अनटायटल प्रोजेक्टचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहेत. साजिद नाडियादवालाच्या प्रोडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन या चित्रपटाची माहिती देण्यात आली आहे. 

'शेहजादा'मध्ये दिसणार कार्तिक
मिळालेल्या माहितीनुसार, या बिग बजेट चित्रपटात कार्तिक आर्यनचा सर्वात वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा खऱ्या कथेवर आधारित असणार आहे. अद्याप या चित्रपटाचा तपशील समोर आलेला नाही. दरम्यान, 'भूल भुलैया 2' नंतर आता कार्तिक 'शेहजादा'  (Shehzada) चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरामुलू' चित्रपटाचा रिमेक आहे. 
 

Web Title: Karthik Aaryan got biggest project, will work with sajid Nadiadwala and director kabir khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.