​कृष्ण की कर्ण? ड्रिम प्रोजेक्टमधील भूमिकेने वाढवला आमिर खानचा संभ्रम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 10:17 IST2017-12-25T04:47:13+5:302017-12-25T10:17:13+5:30

आमिर खान एकावेळी एकच चित्रपट करतो, हे तुम्हाला ठाऊक आहेच. सध्या आमिर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहे. हा चित्रपट ...

Karna of Krishna? Amir Khan's confusion over the role of the Dream project! | ​कृष्ण की कर्ण? ड्रिम प्रोजेक्टमधील भूमिकेने वाढवला आमिर खानचा संभ्रम!!

​कृष्ण की कर्ण? ड्रिम प्रोजेक्टमधील भूमिकेने वाढवला आमिर खानचा संभ्रम!!

िर खान एकावेळी एकच चित्रपट करतो, हे तुम्हाला ठाऊक आहेच. सध्या आमिर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहे. हा चित्रपट हातावेगळा केल्यानंतर आमिर अंतराळवीर राकेश शर्मा याच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये बिझी होणार होता. पण अचानक आमिरचे मन बदलले आणि त्याने राकेश शर्माच्या बायोपिकला ऐनवेळी नकार दिला. या नकारामागचे कारण आम्ही तुम्हाला सांगितले आहेच.  या नकारामागचे कारण होते, ‘महाभारत’. होय, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’नंतर आमिर ‘महाभारत’ हा आपला ड्रिम प्रोजेक्ट हाती घेणार असल्याचे कळतेय. आमिरचा हा ड्रिम प्रोजेक्ट सहा ते सात भागांत असेल, असेही समजतेयं. ‘सीक्रेट सुपरस्टार’फेम दिग्दर्शक अद्वैत चंदन ‘महाभारत’ फ्रेचाईजी दिग्दर्शित करतील आणि आमिर याचा निर्माता असेल. शिवाय तो यात अभिनयही करणार असल्याची माहिती आहे.   चर्चा खरी मानाल तर आमिर व त्याच्या लेखकांच्या टीमने याची तयारीही सुरु केली आहे. पुण्याच्या लायब्ररीत असतील नसतील तितक्या महाभारतावरील  पुस्तकांचा आमिर व त्याची टीम फडशा पाडला आहे. एकंदर काय तर चित्रपटावरचे काम सुरु झाले आहे. पण खरी अडचण यानंतरची आहे. होय,  यानंतरचा एक निर्णय घेण्यास आमिरला अडचण जात आहे. या ड्रिम प्रोजेक्टमधील स्वत:च्या भूमिकेची निवड करण्यात आमिरला अडचण जात आहे. 
अनेकांच्या मते, या फ्रेंचाईजीमध्ये आमिरने कृष्णाची भूमिका साकारायला हवी. पण आमिरचे महाभारतातील सगळ्यात आवडते पात्र कर्ण आहे. त्यामुळे या दोनपैकी कुठल्या भूमिकेची निवड करावी, याबाबत आमिर संभ्रमात आहे. अर्थात आमिरचा हा संभ्रम फार काळ टिकणारा नाहीच. कारण कोणती भूमिका करावी, कोणती नाही, हे निवडण्यातच तर आमिर ‘मास्टर’ आहे. म्हणूनच तर त्याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात.

ALSO READ : ​आमिर खानच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’मध्येही फातिमा सना शेख?

 ‘महाभारतावर चित्रपट हे माझे स्वप्न आहे. पण यासाठी मला माझ्या आयुष्याची १५ ते २० वर्षे द्यावी लागतील, हे मी जाणतो आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट हाती घेण्यास घाबरतोयं,’ असे अलीकडे आमिर म्हणाला होता. 

Web Title: Karna of Krishna? Amir Khan's confusion over the role of the Dream project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.