दुस-या लग्नाबद्दल काय विचार करते करिश्मा कपूर, पापा रणधीर कपूर यांनी दिले उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 14:09 IST2018-06-07T08:39:46+5:302018-06-07T14:09:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे नाव अलीकडे बिजनेसमॅन  संदीप तोष्णीवालसोबत जोडले जात आहे. २०१४ मध्ये पती संजय कपूरपासून विभक्त ...

Karishma Kapoor, father Randhir Kapoor gave a thought to what the other marriage idea was !! | दुस-या लग्नाबद्दल काय विचार करते करिश्मा कपूर, पापा रणधीर कपूर यांनी दिले उत्तर!!

दुस-या लग्नाबद्दल काय विचार करते करिश्मा कपूर, पापा रणधीर कपूर यांनी दिले उत्तर!!

लिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे नाव अलीकडे बिजनेसमॅन  संदीप तोष्णीवालसोबत जोडले जात आहे. २०१४ मध्ये पती संजय कपूरपासून विभक्त झाली आणि यानंतर करिश्मा व संदीप यांच्या नात्याची चर्चा झाली. गेल्या वर्षभरात करिश्मा व संदीप दोघेही अनेकदा एकत्र दिसले. मग तो कपूर घराण्यातील कुठला इव्हेंट असो वा करिना कपूरच्या घरची पार्टी. साहजिकचं करिश्मा व संदीप लग्न करणार, अशा चर्चा ऐकायला येऊ लागल्या. करिश्मा अद्याप या मुद्यावर काहीही बोललेली नाही. तिने या बातम्यांना दुजोरा दिला नाही, तसाच नकारही दिला नाही. पण करिश्माचे डॅड रणधीर कपूर यांनी मात्र करिश्माच्या लग्नाच्या बातम्यांवर कदाचित पूर्णविराम लावला आहे.


होय, एका ताज्या मुलाखतीत रणधीर कपूर यांना करिश्माच्या दुस-या लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला. यावेळी रणधीर यांनी यासंदर्भातील सगळ्या बातम्या अफवा असल्याचे सांगितले. करिश्माने लग्न करावे, असे मला मनापासून वाटते. मी यासंदर्भात तिच्यासोबत चर्चाही केलीय. पण करिश्माने दुस-या लग्नास नकार दिला आहे. मी दुस-यांदा लग्न करू इच्छित नाही, हे तिने स्पष्टपणे मला सांगितले आहे. करिश्माचा सध्या एकच प्लान आहे, तो म्हणजे दोन्ही मुलांचे योग्य संगोपन. ती आपल्या मुलांच्या पालनपोषणात आनंदी आहे, असे रणधीर कपूर म्हणाले.

ALSO READ: आमिर खानने 22 वर्षानंतर सांगितली त्या ‘किसींग सीन’च्या पडद्यामागची कहाणी!

संदीप तोष्णीवाल यांच्यासोबतच्या करिश्माच्या अफेअरची चर्चा रणधीर यांनी स्पष्टपणे नाकारली. मी व्यक्तिश: संदीपला ओळखत नाही़ करिश्मा व संदीप दोघेही चांगले मित्र आहेत. सध्या तरी मी इतकेच सांगेल की, करिश्मा एक सिंगल वूमन आहे. संदीपसोबत तिला बाहेर फिरावे वाटतं असेल तर त्यात काहीही गैर नाही. आपल्या मित्रांसोबत वेळ घालवण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Karishma Kapoor, father Randhir Kapoor gave a thought to what the other marriage idea was !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.