कियारा अडवाणी दिसणार शाहिद कपूरसोबत 'या' चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 16:14 IST2017-05-04T10:44:10+5:302017-05-04T16:14:10+5:30
कियारा अडवाणीच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. भले ही कियाराचा मागचा चित्रपट मशीन बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी यामुळे ...
.jpg)
कियारा अडवाणी दिसणार शाहिद कपूरसोबत 'या' चित्रपटात
क यारा अडवाणीच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. भले ही कियाराचा मागचा चित्रपट मशीन बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी यामुळे कियाराच्या करिअरचे कोणतेच नुकसान झालेले नाही. संजय लीला भंसाली यांच्या प्रोडक्शन हाऊसबरोबर तिने तीन चित्रपट साईन केल्याचे कळते आहे. ज्यातला पहिला चित्रपट 'ट्यूजडे एंड फ्राइडे’. या चित्रपटात कियाराच्या अपोझिट शाहिद कपूर असणार आहे. हा चित्रपट डान्सवर आधारित आहे. याचबरोबर यात रोमांस आणि कॉमेडीचा तडकापण पाहायला मिळाणार आहे. कियारा आणि शाहिद पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. कियाराने बॉलिवूडमध्ये फुगली चित्रपटाव्दारे पदार्पण केले होते. त्यानंतर ती एम एस धोनीच्या बायोपिकमध्ये साक्षीच्या भूमिकेत दिसली होती. मशीन हा कियाराचा तिसरा चित्रपट होता ज्याचे दिग्दर्शन अब्बास यांचा मुलगा मुस्तफा बुर्मावाले यांने केले होते. संजय लीला भंसाली सध्या त्यांच्या पद्मावती चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याचित्रपटात शाहिद राजा रावल रत्न सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. याचित्रपटा दीपिका पादुकोण राणी पद्मावतीच्या भूमिका साकारतेय. पद्मावती शाहिदचा संजय लीला भंसालींबरोबरचा पहिला चित्रपट आहे. आपल्या 14 वर्षांच्या करिअरमध्ये शाहिदने संजय लीला भंसाली यांच्यासोबत कधीच काम केले नव्हते. काहि दिवसांपूर्वीच खबर आली होती की पद्मावतीनंतर शाहिद आणखीन एका चित्रपटात संजय लीला भंसाली यांच्याबरोबर करणार आहे. संजय लीला भंसाली आपल्या चित्रपटातील कलाकार नेहमीच रिपीट करतात. सलमान खान आणि ऐश्वर्या रायसोबत दोन चित्रपट केले आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणसोबतचा हा त्यांचा तिसरा चित्रपट आहे.