करिना कपूर घेणार छोटया पडदयावर मोठी रक्कम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 17:13 IST2017-02-12T11:43:22+5:302017-02-12T17:13:22+5:30

बॉलिवुडची तगडी अभिनेत्री करिना कपूर ही आता चित्रपटानंतर छोटया पडदयावर आकर्षित करण्यासाठी सज्ज झाली आहे. हो, कारण  नुकतीच आंतरराष्ट्रीय ...

Kareena Kapoor will take a big amount on the small screen? | करिना कपूर घेणार छोटया पडदयावर मोठी रक्कम?

करिना कपूर घेणार छोटया पडदयावर मोठी रक्कम?

लिवुडची तगडी अभिनेत्री करिना कपूर ही आता चित्रपटानंतर छोटया पडदयावर आकर्षित करण्यासाठी सज्ज झाली आहे. हो, कारण  नुकतीच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वाहिनीने तिची सदिच्छादूत म्हणून निवड केली आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या सोनी बीबीसी अर्थ या वाहिनीवर करिना झळकणार आहे. या वाहिनीचीचे लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार असून करिना कपूर या वाहिनीचा चेहरा असेल. सोनी पिक्चर्स नेटवर्कस इंडियाचे व्यावसायिक मुख्य अधिकारी सौरभ यज्ञिक यांनी करिनाच्या निवड योग्य असल्याचे म्हटले असून करिनामुळे भारतामध्ये चांगला प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यात यश मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
     
       करिनाच्या व्यावसायिक जीवनशैली आणि खासगी जीवनशैली दोन्हींमधील तेज आणि उत्साह एकसारखा असल्यामुळेच करिनाची निवड करण्यात आली आहे.  करिनाने नुकतेच या ब्रॅडच्या जाहिरातीसाठी दोन दिवसांचे चित्रीकरण केले असून यासाठी तिने तब्बल १२ कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे. मात्र या गोष्टीला करिनाने अजून दुजोरा दिलेला नाही. मात्र ही चर्चा सत्यास उतरल्या करिना छोटया पडदयावर मोठी रक्कम घेणारी अभिनेत्री ठरेल. करिनाच्या सौंदर्यची आणि फॅशनची झलक नुकतीच लॅक्मे फॅशनशोमध्ये पाहायला मिळाली होती. दोनवेळा आयोजित होणारा लॅक्मे फॅशन शो हा देशातल्या फॅशन शोजमधील सगळ्यात नामांकीत फॅशन शो आहे. लॅक्मे फॅशन वीकच्या शानदार सांगता सोहळ्यात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरने फॅशन डिझायनर सब्यासाचीसाठी रॅम्प वॉक केल्याचे दिसले होते. लॅक्मे फॅशन वीकची सदिच्छादूत असलेल्या करिनाने आपल्या गर्भारपणाबद्दल आणि कामाविषयी दिलखुलास गप्पा मारल्याचेही ऐकायला मिळाले होते. चला तर वाट पाहूयात करिना कपूर या गोष्टीला कधी दुजोरा देते.

Web Title: Kareena Kapoor will take a big amount on the small screen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.