​करिना कपूरचा टोमणा मीरा राजपूतच्या जिव्हारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 10:34 IST2017-04-06T05:04:00+5:302017-04-06T10:34:00+5:30

जागतिक महिला दिनी शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिच्या एका वक्तव्याने चांगलेच वादळ उठले होते. कामकाजी महिलांना मुलांपेक्षा स्वत:चे ...

Kareena Kapoor tumana Mira Rajput's jivari! | ​करिना कपूरचा टोमणा मीरा राजपूतच्या जिव्हारी!

​करिना कपूरचा टोमणा मीरा राजपूतच्या जिव्हारी!

गतिक महिला दिनी शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिच्या एका वक्तव्याने चांगलेच वादळ उठले होते. कामकाजी महिलांना मुलांपेक्षा स्वत:चे करिअर महत्त्वाचे वाटते. फक्त काही तास मुलीसोबत घालवून मला कामासाठी घराबाहेर जायचे नाहीये. असे करायचे असते तर मला तिची गरजच काय  होती? मिशा काही कुत्र्याचे पिल्लू नाही. मला तिला मोठे होताना पाहायचे आहे, असे मीरा या मुलाखतीदरम्यान म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाले होते. कोणतीही आई आपल्या मुलाला आनंदाने घरी सोडून कामाला जात नाही, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर  उमटल्या होत्या. 

ALSO READ : OMG !! ​वर्गमित्राने मीरा राजपूतबद्दल केले धक्कादायक खुलासे!

मीराच्या या वक्तव्याचा अलीकडे करिना कपूर खानने चांगलाच समाचार घेतला होता. अर्थात करिनाने मीराचे नाव घेतले नव्हते. पण करिनाचा इशारा तिचा एक्स बॉयफ्रेन्ड शाहिद कपूरची पत्नी मीराकडेच होता. मी डिलीवरीनंतर लगेच अ‍ॅक्टीव्ह झाली. यासाठी मला जज केले गेले. मी स्वत:ला कसे मेंटेन करते,मी कशी आई आहे, यावर बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही. मी कशाप्रकारे माझ्या मुलाचे संगोपन करते हे येणारा काळच ठरवेल. मी त्याबद्दल कुठलाही गाजावाजा करणार नाही किंवा तैमुरवर किती प्रेम करते हेही ओरडून सांगणार नाही. माझ्याकडे इतरांचे लक्ष असल्याचे दडपण माझ्यावर नेहमीच असते. पण, ती परिस्थिती तुम्ही कशी सावरता हे जास्त महत्त्वाचे आहे. प्रत्येक स्त्रीसाठी गरोदरपणातील नऊ महिन्यांचा तो काळ आणि अनुभव वेगळा असतो. त्यामध्ये साम्य नसतेच. त्यामुळे त्या क्षणी मला काय वाटत होते हे कोणालाच ठाऊक नव्हते. कारण त्यांच्यापैकी कोणच मला व्यक्तिगतरित्या ओळखत नव्हते, असे करिना म्हणाली.
करिनाचा हा बाण थेट मीराला लागला. मीडियाचे मानाल तर मीरा यामुळे कमालीची नाराज आहे. करिनाचा हा टोमणा तिच्या चांगलाच जिव्हारी लागला म्हणे!

Web Title: Kareena Kapoor tumana Mira Rajput's jivari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.