करिना कपूरने तैमूरच्या जन्मानंतर पाचच महिन्यांत कमी केले १२ किलो वजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 19:34 IST2017-05-16T14:04:54+5:302017-05-16T19:34:54+5:30

अभिनेत्री करिना कपूर-खान महिलांसाठी रोल मॉडेल बनत आहे. होय, तैमूरच्या जन्मानंतर केवळ पाचच महिन्यांत तिने तब्बल १२ किलो वजन ...

Kareena Kapoor reduced the weight of 12 kg in the fifth month after the birth of Timur! | करिना कपूरने तैमूरच्या जन्मानंतर पाचच महिन्यांत कमी केले १२ किलो वजन!

करिना कपूरने तैमूरच्या जन्मानंतर पाचच महिन्यांत कमी केले १२ किलो वजन!

िनेत्री करिना कपूर-खान महिलांसाठी रोल मॉडेल बनत आहे. होय, तैमूरच्या जन्मानंतर केवळ पाचच महिन्यांत तिने तब्बल १२ किलो वजन कमी केले आहे. ही बातमी करिनाच्या फॅन्ससाठी सुखद धक्का देणारी असून, करिनाच्या या डेडीकेशनला बघून तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे. 

खरं तर करिनाला बॉलिवूडमधील अतिशय फिट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. मात्र प्रेग्नेंसीदरम्यान तिचे वजन वाढल्याने, ती प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसून आले. त्यातच परफेक्ट फिगर असलेल्या अ‍ॅक्ट्रेसमध्ये बेबोचे नाव घेतले जात असल्याने तिच्यावर वाढत्या वजनाचे जणू काही दडपण आले होते. त्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेत केवळ पाचच महिन्यांत १२ किलो वजन कमी केले आहे. वास्तविक एवढे वजन कमी करणे हे एखादे चॅलेंज स्वीकारण्याप्रमाणे आहे. 



करिनाचे प्रेग्नेंसीदरम्यान १८ किलो वजन वाढले होते. त्यामुळे एवढ्या कमी वयात बारा किलो वजन कमी करणे म्हणावे तेवढे नक्कीच सोपे नाही. खरं तर करिनाने अतिशय प्लॅनिंग करून वजन कमी केले आहे. सुरुवातीला तिने यासाठी योगाचा आधार घेतला होता. पुढे तिने एक्सरसाइज करण्यास सुरुवात केली. शिवाय डायटीशियन रुजुता दिवेकर हिने दिलेला डायट चार्टही ती नियमितपणे फॉलो करत होती. 

करिना लवकरच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात करिनासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एकता कपूर आणि रेहा कपूर एकत्र प्रोड्यूस करणार आहेत. टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार करिना लवकरच तिचा बेस्ट फ्रेण्ड करण जोहर याच्यासोबत एका रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. यासाठी सध्या बोलणी सुरू आहे. 

Web Title: Kareena Kapoor reduced the weight of 12 kg in the fifth month after the birth of Timur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.