करिना कपूरने एकेकाळी ‘या’ अभिनेत्यासोबत केला रोमान्स; आता म्हटले, ‘भावासारखा आहे!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 16:43 IST2018-04-11T11:13:01+5:302018-04-11T16:43:22+5:30
अभिनेत्री करिना कपूर-खान सध्या तिच्या लाडक्या तैमूरमुळे नव्हे तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. वास्तविक करिना इंडस्ट्रीतील आघाडींच्या अभिनेत्रींपैकी ...
.jpg)
करिना कपूरने एकेकाळी ‘या’ अभिनेत्यासोबत केला रोमान्स; आता म्हटले, ‘भावासारखा आहे!’
अ िनेत्री करिना कपूर-खान सध्या तिच्या लाडक्या तैमूरमुळे नव्हे तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. वास्तविक करिना इंडस्ट्रीतील आघाडींच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. करिनाने २००० या साली ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटात तिच्या अपोझिट अभिनेता अभिषेक बच्चन होता. अभिषेकनेदेखील याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात अभिषेकचा अभिनय फारसा पसंत केला नाही, मात्र करिनाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले. कारण तिने चित्रपटात अभिषेकसोबत दिलेले रोमॅण्टिक सीन्स प्रेक्षकांना चांगले भावले होते. विशेष म्हणजे अभिषेकसोबत रोमान्स करताना ती निर्मात्यांच्या कसोटीवर खरी उतरली होती.
चित्रपटात काही असे सीन्स होते, ज्यामध्ये करिनाला अभिषेकसोबत जबरदस्त रोमान्स करायचा होता. अशात करिनाने दिग्दर्शकांना विचारले होते की, हे सर्व काही कसे करायचे आहे? अभिषेक तर माझ्या भावासारखा आहे. अभिषेकने नुकतेच एका शोदरम्यान याबाबतचा खुलासा केला. त्याचा करिनासोबत सर्वात रोमॅण्टिक सीन होता, जो तो कधीच विसरू शकत नाही. करिनाने सांगितले की, ‘मला तुझ्यासोबत रोमॅण्टिक सीन देणे अवघड आहे. कारण तू माझ्या भावासारखा आहेस.’ अभिषेकने हेदेखील सांगितले की, करिना जेपी सर यांच्याकडे गेली होती. तिने त्यांना म्हटले की, ‘जेपी अंकल मी हे असे कसे करू, एबी माझ्या भावासारखा आहे.’
![]()
रिपोर्ट्सनुसार, याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करिना कपूरची मोठी बहीण करिश्मा कपूर आणि अभिषेकमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. करिश्मा नेहमीच करिनाला भेटण्यासाठी सेटवर जायची. याचदरम्यान अभिषेक आणि करिश्मा यांच्यात संवाद सुरू झाला. पुढे २००२ मध्ये दोघांनी साखरपुडा केला. परंतु अभिषेक करिश्माचे लग्न होऊ शकले नाही.