करिना कपूर-खानने शेअर केले ग्लॅमरस फोटो; यूजर्सनी म्हटले, ‘भयानक दिसत आहेस’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 16:39 IST2018-01-02T11:09:19+5:302018-01-02T16:39:35+5:30

करिना कपूर-खानने नव्या वर्षाची सुरुवात अतिशय ग्लॅमरस अंदाजाने केली. परंतु काही यूजर्सला तिचा हा ग्लॅमरस अंदाज अजिबातच भावला नाही. त्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठविली.

Kareena Kapoor-Khan shared glamorous photos; The user said, 'look awesome!' | करिना कपूर-खानने शेअर केले ग्लॅमरस फोटो; यूजर्सनी म्हटले, ‘भयानक दिसत आहेस’!

करिना कपूर-खानने शेअर केले ग्लॅमरस फोटो; यूजर्सनी म्हटले, ‘भयानक दिसत आहेस’!

िनेत्री करिना कपूर-खानने नव्या वर्षाचे सेलिब्रेशन पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर याच्यासोबत स्वीत्झर्लंड येथे केले. न्यू इअर सेलिब्रेशनचे बरेचसे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. यातील काही फोटो सध्या यूजर्समध्ये चांगलेच चर्चिले जात आहेत. एकीकडे करिनाने शेअर केलेला तैमूरचा फोटो पसंत केला जात आहे, तर दुसरीकडे तिच्या ग्लॅमर अंदाजातील फोटोची यूजर्सकडून खिल्ली उडविली जात आहे. न्यू इअर पार्टीदरम्यान करिनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमधील काही फोटोज् तिने सोशल मीडियावर शेअर केले. आता याच फोटोवरून ती ट्रोल होत असून, यूजर्सकडून तिच्या फोटोला विचित्र कॉमेण्ट दिल्या जात आहेत. 

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी करिना पती सैफ आणि मुलगा तैमूरसोबत स्वीत्झर्लंड येथे गेली होती. याठिकाणी तिने आपल्या परिवारासोबत सुट्या एन्जॉय केल्या. तिच्या या हॉलिडेचे काही फोटोज्ही तिने सोशल मीडियावर शेअर केले. तसेच पार्टीतील ब्लॅक ड्रेसमधील एक फोटोही तिने शेअर केला. हा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने डिझाइन केला होता. मात्र करिनाचा या ड्रेसमधील फोटो यूजर्सला अजिबातच भावला नाही. वास्तविक लोकांनी तिच्या स्टाइलचे कौतुक केले, परंतु त्याचबरोबर तिच्या मेकअपवर जोरदार टीकाही केली. 
 

एका इन्स्टा यूजरने लिहिले की, ‘तुझ्या चेहºयाला काय झाले?’ आणखी यूजरने लिहिले, ती स्वत:ला चांगले दाखविण्याचा जरा जास्तच प्रयत्न करीत आहे. तर एका यूजरने लिहिले, ‘तू खूप भयानक दिसत आहेस’! खरं तर करिना अशाप्रकारे पहिल्यांदाच ट्रोल झाली नाही. यापूर्वीदेखील लूकवरून तिच्यावर टीका करण्यात आली आहे. याअगोदर पती सैफच्या बर्थडेवेळी चाहत्यांनी तिला ट्रोल केले होते. कारण सैफच्या बर्थ डे पार्टीतील तिचे काही असे फोटोज समोर आले होते, जे तिच्या चाहत्यांना अजिबातच भावले नव्हते. 

Web Title: Kareena Kapoor-Khan shared glamorous photos; The user said, 'look awesome!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.