तर असा दिसतो ‘सैफिना’चा जहांगीर!  पहिल्यांदाच लेकासोबत दिसले सैफ-करिना, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 16:06 IST2021-08-13T16:06:26+5:302021-08-13T16:06:56+5:30

अखेर छोट्या जहांगीरची झलक चाहत्यांना दिसलीच. होय, आजोबा रणधीर कपूर यांच्या घरी जातानाचे त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Kareena Kapoor Khan, Saif Ali Khan's Second Son Jehangir Spotted by Paparazzi for the First Time | तर असा दिसतो ‘सैफिना’चा जहांगीर!  पहिल्यांदाच लेकासोबत दिसले सैफ-करिना, पाहा व्हिडीओ

तर असा दिसतो ‘सैफिना’चा जहांगीर!  पहिल्यांदाच लेकासोबत दिसले सैफ-करिना, पाहा व्हिडीओ

करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) व सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा धाकटा लेक जहांगीर अली खान ( Jehangir) सध्या जाम चर्चेत आहे. जहांगीरचा जन्म झाला आणि तेव्हापासून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर होते. नाही म्हणायला करिनाने त्याचे काही फोटो शेअर केले होते, पण या  प्रत्येक फोटोत त्याचा चेहरा चतुराईने लपवला होता. पण अखेर छोट्या जहांगीरची झलक चाहत्यांना दिसलीच.
होय, आजोबा रणधीर कपूर यांच्या घरी जातानाचे त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सैफ अली खान व करिना हेही या फोटोत दिसत आहेत. फोटोत चिमुकला जहांगीर बाबाच्या कडेवर दिसतोय. 

करिनाने यावर्षी 21 फेबु्रवारीला जहांगीरला जन्म दिला होता. तेव्हापासून करिना व सैफने जाणीवपूर्वक त्याचा चेहरा जगापासून लपवला होता. शिवाय अगदी आत्ता आत्तापर्यंत त्याच्या नावाचाही खुलासा केला नव्हता.

अगदी अलीकडे करिनाने आपल्या दुस-या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याचा खुलासा झाला आणि अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. तिच्यासोबत सैफ अली खानही ट्रोल झाला. लोकांनी नको त्या कमेंट्स करत, सैफिनाला फैलावर घेतले.


2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्यानं तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटलं जातं. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचं नाव ठेवावं, यावर लोकांचा आक्षेप होता. या वादानंतर सैफने एका क्षणाला तैमूर हे नाव बदलण्याचाही विचार केला होता. पण करिनाचा याला विरोध होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर करिना व सैफने आपल्या दुस-या मुलाचे नाव अधिकृतपणे जाहिर केले नव्हते. शिवाय अद्याप त्याचा चेहराही जगाला दाखवला नव्हता.

Web Title: Kareena Kapoor Khan, Saif Ali Khan's Second Son Jehangir Spotted by Paparazzi for the First Time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.