सोहाव्यतिरिक्त सैफला आहे आणखी एक सख्खी बहीण; अद्यापही आहे अविवाहित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 15:03 IST2022-05-03T15:02:21+5:302022-05-03T15:03:08+5:30
Saba pataudi: सैफच्या एकंदरीत कुटुंबाविषयी नेटकऱ्यांना चांगलीच माहिती आहे. मात्र, सोहा व्यतिरिक्त सैफला आणखी एक सख्खी बहीण आहे हे फार मोजक्या जणांना माहित आहे.

सोहाव्यतिरिक्त सैफला आहे आणखी एक सख्खी बहीण; अद्यापही आहे अविवाहित
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (saif ali khan) त्याच्या उत्तम अभिनयासह नवाबी थाटासाठीही ओळखला जातो. त्यामुळे सैफच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्याच्या पर्सनल लाइफविषयीदेखील साऱ्यांनाच ठावूक झालं आहे. सैफच्या पत्नी,आई, बहीण हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यामुळे सैफच्या एकंदरीत कुटुंबाविषयी नेटकऱ्यांना चांगलीच माहिती आहे. मात्र, सोहा व्यतिरिक्त सैफला आणखी एक सख्खी बहीण आहे हे फार मोजक्या जणांना माहित आहे. अलिकडेच त्याच्या या बहिणीने तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी करीनाने (Kareena Kapoor Khan) तिला शुभेच्छा देत तिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हापासून सैफच्या या बहिणीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या सख्ख्या नणंदेसोबत एक फोटो शेअर केला. तसंच तिच्यासाठी खास गिफ्टही पाठवलं. करीनाची ही पोस्ट तिच्या नणंदेनेही सोशल मीडियावर शेअर करत करीनाचे आभार मानले.
कोण आहे सैफची मोठी बहीण?
सैफच्या मोठ्या बहिणीचं नाव सबा पटौदी(Saba Pataudi) असं आहे. सबा कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. यात अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. विशेष म्हणजे सबा ४६ वर्षांची असून अद्यापही तिने लग्न केलेलं नाही. सबा एक ज्वेलरी डिझायनर आहे. २०११ साली मंसूर अली खान पटौदी यांच्या निधनानंतर त्यांच्या भोपाळच्या शाही ट्रस्टची विश्वस्त म्हणून सबाची नेमणूक करण्यात आली.
सैफ-करीनाने पाठवलं खास बर्थ डे गिफ्ट
सबाचा वाढदिवस असल्यामुळे सैफ-करीनाने तिच्यासाठी खास केक पाठवला. सोबतच एक ग्रिटिंग कार्डही होतं. 'हॅप्पी बर्थ डे डिअर सबा!! लव्ह यू..सैफ (भाई)', अशा ओळी त्याने या कार्डवर लिहिल्या होत्या.