तब्बल 9 वर्षांनंतर करिना कपूर-अक्षय कुमार शेअर करणार स्क्रिन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 12:52 IST2018-06-02T07:22:46+5:302018-06-02T12:52:46+5:30
तब्बल नऊ वर्षांनंतर चित्रपटसृष्टीतील हे दोन स्टार एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आम्ही बोलतोय ते अक्षय कुमार आणि ...

तब्बल 9 वर्षांनंतर करिना कपूर-अक्षय कुमार शेअर करणार स्क्रिन!
त ्बल नऊ वर्षांनंतर चित्रपटसृष्टीतील हे दोन स्टार एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आम्ही बोलतोय ते अक्षय कुमार आणि करिना कपूर खानबद्दल. 2009मध्ये आलेल्या कमबख्त इश्क या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. करण जोहर अक्षय कुमार आणि करिना कपूर यांना घेऊन चित्रपट तयार करतो आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात करिना कपूर आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या अपोझिट अक्षय कुमारला कास्ट करण्यात आले आहे. पण करिना कपूरशी या भूमिकेबाबत चर्चा सुरु आहे. करिनाला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे आणि लवकरच ती यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. यात करिना आणि अक्षयशिवाय आणखीन एक कपल दाखवले जाणार आहे. चित्रपटाच्या कथेबाबत बोलायचे झाले तर ती अजून स्पष्ट नाही झाली. अक्षयने त्याच्या 24 वर्षांच्या करिअरमध्ये करण जोहरसोबत 2015मध्ये आलेल्या 'ब्रदर्स' चित्रपट काम केले होते. तसेच अक्षय सध्या करणसोबत आणखीन एक चित्रपट करतो आहे. सध्या त्या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. अक्षयच्या केसरी चित्रपटाची निमिर्तीदेखील करण जोहरच करतो आहे. काही दिवसांपूर्वी या सेटला आग लागली होती.
ALSO READ : करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली
या चित्रपटात अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते. हे युद्ध १८९७ मध्ये झाले होते. ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या साहसाची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन इश्वर सिंगने १० हजार सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. दुर्दैवाने तिसऱ्या वेळेस त्याचा पराभव झाला पण पूर्ण ब्रिटिश आर्मी येईपर्यंत त्यांनी १० हजार सैन्याला थोपवून ठेवले होते. केसरी हा चित्रपट शूरवीर इश्वर सिंगची गोष्ट सांगणार आहे.